साखर विरघळली आणि खड्डे पडले – कुशल बद्रिके

साखर विरघळली आणि खड्डे पडले – कुशल बद्रिके

अभिनेता कुशल बद्रिके

कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. या खड्यांमुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाल सामोरे जावे लागत आहे. रस्त्याने चालताना नागरिकांना ‘रत्यात खड्डा की खड्ड्यात खड्यात रस्ता?’ असे उपरोधक प्रश्न पडत आहे. याच रस्त्यांविषयी अभिनेता कुशल बद्रिकेने फेसबुकवर पोस्ट टाकून प्रतिक्रिया दिली आहे. कुशल हा डोंबिवलीचा असून, त्यालाही खड्ड्यांपासून होणाऱ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

कुशलची मिश्किल फेसबूक पोस्ट

कल्याण-डोंबिवलींच्या रस्त्यांवरील जीवघेण्या खड्यांवर अभिनेता कुशल बद्रिकेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘डोंबिवलीचे रस्ते बनवताना महापालिकेने खडीसोबत डांबर न वापराता साखर वापरली असावी, ज्यामुळे ती पाण्यात विरघळी’, अशी मिश्कील प्रतिक्रिया कुशल बद्रिकेने फेसबूकवर पोस्ट केली आहे. त्याचबरोबर केडीएमसी पुन्हा एकदा रॉक्स असेही कुशलेने म्हटले आहे. बऱ्याच दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत रस्ते हे मोठ्या चर्चेचे विषय बनले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे भोंगळ कारभार समोसआला आहे.

कल्याण-डोंबिवलीत रस्त्यांची बिकट अवस्था

पावसाळा आणि खड्डे यांचे एक जुने समीकरण आहे. दरवर्षी कल्याण-डोबिंवलीच्या रहिवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते. यावर्षी कल्याणमध्ये खड्यांमुळे सहा लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी देखील प्रशासनाला अजूनही जाग आलेली नाही. अनेक संघटना खड्यांच्या विरोधात केडीएमसी कार्यालयाच्या बाहेर आंदोलने करत आहेत. तरीही नागरिकांना रस्त्यावरील खड्डे भरले जाताना दिसत नाही.

सोशल मिडियावर सेलिब्रिटींची प्रतिक्रिया

कुशल हा सध्या झी मराठीच्या ‘चला हवा येऊ द्या’, या कार्यक्रमाचा महत्वाचा घटक आहे. आपल्या अभिनयाच्या कौशल्याने तो प्रेक्षकांना खळखळून हसवतो. त्याने खड्ड्यांवर टाकलेल्या फेसबुक पोस्टला बऱ्याच लोकांनी शेअर केले आहे. आपले मत, प्रतिक्रीया प्रेक्षकांना आणि चाहत्यांशी शेअर करण्यासाठी सोशल मीडिया हे महत्वाचे माध्यम आहे. याच माध्यमातून सेलिब्रेटी आपले मत लोकांपर्यत पोहोचवत असतात.

First Published on: July 19, 2018 2:45 PM
Exit mobile version