ललितचा ‘टर्री’ येतोय नव्या वर्षात टर्रारून टरकवायला

ललितचा ‘टर्री’ येतोय नव्या वर्षात टर्रारून टरकवायला

ललितचा 'टर्री' येतोय नव्या वर्षात टर्रारून टरकवायला

मराठी अभिनेता ललित प्रभाकरचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे मोशन पोस्टर नुकतेच लाँच झाले आहे. ‘टर्री’ असे या नव्या सिनेमाचे नाव आहे. सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर अभिनेता ललित प्रभाकरने त्याच्या सोशल मीडियावरून शेअर केले आहे. ललितच्या या सिनेमाची झलक पाहून एखाद्या हॉलिवूड सिनेमाची आठवण होते. टर्री या सिनेमातून पुन्हा एकदा मराठी सिनेमात काहीतरी नाविन्यपूर्ण पहायला मिळणार आहे. २०२१मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

‘नव्या जोशात, नव्या जोमात, टर्री येतोय, टर्रारून टरकवायला नव्या वर्षात’ असे म्हणत ललितने त्याच्या सोशल मीडियावरून सिनेमाचे मोशन पोस्टर लाँच केले आहे. सिनेमाच्या शीर्षकापासून सादरीकरणापर्यंत सर्वच पातळीवर हा सिनेमा वेगळ्या धाटणीचा असलेल्याचे दिसून येत आहे. ‘टर्री’ म्हणजे काय तर बेधडक जबरदस्त ऊर्जा असलेला, सळसळत्या रक्ताचा तरुण. जो तरूण बेफिकीर आणि बेधडक आहे. त्याच्यात काहीही करण्याची धमक आहे. टेररबाज वृत्तीचा, वेळप्रसंगी समाजाच्या विरुद्ध जाऊन बंडखोरी करण्याची ताकद अंगी असलेला एखादा डॅशिंग तरुण म्हणजे ‘टर्री’. या सिनेमातून अभिनेता ललित प्रभाकर एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

टर्री या नव्या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती ऑन युव्हर स्पॉट प्रॅाडक्शनने प्रियामो एन्टरटेन्मेंटच्या सहयोगाने करण्यात आली आहे. गावाच्या रांगड्या मातीच्या शैलीत दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे यांनी केले आहे. या सिनेमासाठी अभिनेता ललित प्रभाकरला त्यांच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ललित नेहमीच त्यांच्या चाहत्यांसाठी नवीन प्रयोग सादर करत असतो.  नव्या वर्षात ललितचा कलरफुल हा सिनेमाही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. लॉकडाऊन दरम्यानही ललित सोशल मीडियावर अनेक प्रयोग करताना दिसून आला होता.


हेही वाचा – ‘सनम हॉटलाईन’ वेबसिरीजला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद

First Published on: December 24, 2020 8:58 PM
Exit mobile version