Suyash Tilak: सुयश टिळक येतोय नव्या रुपात नव्या मालिकेत

Suyash Tilak: सुयश टिळक येतोय नव्या रुपात नव्या मालिकेत

अभिनेता सुयश टिळकनं मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. त्यानं आपल्या अभिनयानं मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी सुयश एक आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ मालिकेतून तो घराघरात पोहोचला. या मालिकेत सुयशनं साकारलेली जयराम भूमिका चांगलीच गाजली. आता लवकरच सुयश नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

“सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांसाठी काळ, सहज नाही लागणार ह्या आदिशक्तीचा ठाव”, असं म्हणत ‘सन मराठी’ने नुकताच ‘आदिशक्ती’ मालिकेचा नवा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये अभिनेता सुयश टिळक महत्त्वाच्या भूमिकेत दिसतोय. कोण कोणाच्या विरोधात उभं राहिल, कोण कोणाचा शत्रु बनेल हे कधीच कोणी सांगू शकत नाही आणि वडीलांची शत्रु स्वत: त्यांची मुलगी असेल तर काय… भितीने थरकाप उडेल अशी घटना चिमुकल्या जीवाशी घडणार असेल तर आईचं काळीज घाबरणारच… पण आई लेकीच्या संरक्षणासाठी आदिशक्तीकडे प्रार्थना करणार आणि तिच्या पाठीशी उभी राहणार दैवी शक्ती, हे या प्रोमोमधून दाखवण्यात आले आहे.

First Published on: April 25, 2024 4:59 PM
Exit mobile version