ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली, रुग्णालयात उपचार सुरु

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत खालावली, रुग्णालयात उपचार सुरु

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. त्यांच्यावर सध्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी आणि डॉक्टरांनी दिली आहे. (Vikram Gokhle Admited To Dinanath Hospital Pune)

गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु असताना अचानक त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र त्यांच्या कुटुंबियांकडून याविषयी कोणतेही निवेदन समोर आलेले नाही. विक्रम गोखले यांचा गेला महिन्यात 30 ऑक्टोबर रोजी 82 वा वाढदिवस साजरा केला. त्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली.

विक्रम गोखले यांनी मालिका, नाटक आणि चित्रपट या तिन्ही मनोरंजन क्षेत्रात आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली. वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात मोलाचे स्थान निर्माण केले. रंगभूमीचा एक मोठा काळ त्यांनी गाजवला. त्यांनी अभिनयासोबत लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही आपली मोहर उमटवली. सध्या विक्रम गोखले तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. काही वर्षांपूर्वी अग्निहोत्री मालिकेतून विक्रम गोखले प्रेक्षकांसमोर आले. या हे मालिकेतील पात्रही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

विक्रम गोखले यांच्या आघात चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक झाले, तर 2013 साली प्रदर्शित झालेला अनुमती या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानै गौरवण्यात आले. दरम्यान घशाच्या त्रासामुळे विक्रम गोखले काही वर्षांपूर्वी नाटकातील अभिनयातून दूर आहेत. सध्या ते नवोदित कलाकारांना अभिनय प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत.
विक्रम गोखले यांनी हिंदी- मराठीतील अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत.


श्रद्धा वालकरचे पत्र गंभीर, तिचा जीव वाचला असता; फडणवीसांकडून चौकशीचे आदेश


 

First Published on: November 23, 2022 4:32 PM
Exit mobile version