Mrinal Kulkarni : मृणाल कुलकर्णींनी सांगितलं फिटनेस सिक्रेट

Mrinal Kulkarni : मृणाल कुलकर्णींनी सांगितलं फिटनेस सिक्रेट

एक काळ होता जेव्हा मृणाल कुलकर्णी (mrinal kulkarni) ही थोरा मोठ्यांमध्ये सर्वांचीच लाडकी होती. सोनपरी (sonpari) हे तिचे पात्र आणि हळदी चंदनाच्या क्रीमची जाहिरात करून त्या घरा घरात पोहचल्या. मृणाल कुलकर्णी यांनी अभिनयाने मराठी सिनेसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांच्या मनमोहक रूपाचे आणि हास्याचे अनेक चाहते आहेत. मृणाल यांच्या फिटनेसचं कायमच कौतुक होत असतं. सोबतच त्यांच्या सौंदर्याचंदेखील कायम चाहत्यांना अप्रूप वाटत आलंय. मृणाल कुलकर्णीं यांनी एका मुलाखतीत त्यांच्या फिटनेसचं रहस्य उघड केलं आहे. काय आहे हे फिटनेस रुटीन जाणून घेऊयात.

घरगुती उपायांचा वापर

मृणाल कुलकर्णीं यांनी एका मुलाखतीत त्यांच्या फिटनेसचं रहस्य उघड केलं आहे . मृणाल कुलकर्णीचे वय आता 50 च्या पार आहे. मृणाल पार्लर ट्रिटमेंट सुद्धा घेते. पण तिची पहिली आवड आणि प्राधान्य हे घरगुती उपायांनाच आहे. आपल्या ग्लोइंग स्कीन आणि फिटनेसबाबत मृणाल म्हणते की, “मी ज्या प्रोफेशन मध्ये आहे येथे फिटनेस एक अनिवार्य गोष्ट आहे. सध्याच्या काळात तर ही गोष्ट प्रत्येक प्रोफेशन साठीच गरज बनली आहे. त्यामुळे माझं शुटींग रात्री असो वा सकाळी मी दोन गोष्टींची पूर्ण काळजी घेते ज्यामुळे माझी स्कीन आणि बॉडी नेहमी रिलॅक्स राहते.

नियमित व्यायाम

वयाची पन्नाशी ओलांडून गेली तरी मृणाल व्यायामात खंड पडू देत नाही. तिचे म्हणणे आहे की, आठवड्यातून सात दिवस रोज पन्नास मिनिटांचा व्यायाम ठरलेला असतो. यात मी वॉक करते किंवा व्यायाम करते. कदाचित हेच कारण आहे की मृणालच्या चेहऱ्यावर तिचे वाढते वय दिसून येत नाही. व्यायाम केल्याने त्वचेमधील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत राहते आणि ऑक्सिजन लेव्हल सुद्धा संतुलित राहते. यामुळे फाईन लाईन्स आणि त्वचेवर सुरकुत्या दिसून येत नाहीत.

आहाराची वेळ

मृणाल म्हणते की, “सकाळी नाश्ता, मग 11 वाजता फळे किंवा ज्यूस, त्यानंतर 2 वाजता लंच आणि 5 वाजता संध्याकाळचा नाश्ता म्हणून भेळ, फळे किंवा ड्राय फ्रुट्स हा माझा ठरलेला आहार आहे. अशा प्रकारे मी माझा आहार 5 टप्प्यांमध्ये घेते. शिवाय रोज एक ग्लास दूध देखील पिते. माझे असेही म्हणणे आहे की, स्त्रियांनी दूध अवश्य प्यायला हवे. नाहीतर एका वयानंतर कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास त्याच्या गोळ्या खाव्या लागतात. त्या गोळ्या खाण्यापेक्षा चांगले आहे की आतापासून काळजी घेण्यासाठी रोज 1 ग्लास दूध प्यावे. दूध प्यायल्याने ब्रेन आनंदी राहते आणि स्कीनचा ग्लो सुद्धा वाढतो.”

____________________________________________________________________

हेही पहा : 

First Published on: April 13, 2024 7:30 PM
Exit mobile version