सावकारी जाच, चित्रपट निर्मात्याची आत्महत्या

सावकारी जाच, चित्रपट निर्मात्याची आत्महत्या

कल्याण पडाल. चित्रपट निर्माते, म्होरक्या

सोलापूर / प्रतिनिधी – राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ या मराठी चित्रपटाचे निर्माते कल्याण पडाल (वय ३८) यांनी सावकारांच्या जाचाला कंटाळून सोलापुरात राहत्या घरी गुरुवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे ‘म्होरक्या’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे.

का केली आत्महत्या ?

पडाल यांना आतड्याच्या कर्करोगाने ग्रासले होते. या उपचारासाठी खाजगी सावकाराकडून त्यांनी १ लाख रुपये घेतले होते. ते पैसे परत न करु शकल्याने त्यांनी पोलीस अधीक्षक आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या केली. उपचारासाठी त्यांनी खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. पैसे परत न केल्याने सावकारांनी त्यांना घरातून बाहेर नेले आणि डांबून मारहाण केली होती. पडाल यांचा कर्करोग शेवटच्या टप्प्यात होता. त्यामुळे त्यांनी सोलापूर पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आत्महत्या केली. यामुळे शहरात आणि चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

‘म्होरक्या’चे काय होणार?

पडाल यांनी बनवलेला म्होरक्या चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. कल्याण पडाल यांच्या आत्महत्येने चित्रपट सृष्टी हादरून गेलीय. राष्ट्रीय स्तरावर चित्रपटाने पुरस्कार देखील पटकावेल. पडाल यांच्या आत्महत्येनंतर ‘म्होरक्या’च्या प्रदर्शनावर प्रश्वचिन्ह उपस्थित झालाय.

प्रकरणाची चौकशी होणार

निर्माता कल्याण पडाल यांनी नेमके कोणाबरोबर आर्थिक व्यवहार केले होते. कशासाठी पैसे घेतले होते. याची माहिती घेऊन तक्रार आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. त्यांचे नातेवाईक पुढील गुरुवारी येणार असून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येईल. त्यांच्या फिर्यादीनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जेलरोडचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पवार यांनी सांगितले.

First Published on: May 21, 2018 7:27 AM
Exit mobile version