सचिन पिळगांवकरांचा ‘अशी ही आशिकी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सचिन पिळगांवकरांचा ‘अशी ही आशिकी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सचिन पिळगांवकरांचा 'अशी ही आशिकी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले दिग्दर्शक आणि अभिनेते पिळगांवकर यांनी त्यांच्या ६०व्या वाढदिवसाला प्रेक्षकांसाठी एक खास भेट म्हणून त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. खास सरप्राईज ठरलेला तो मराठी चित्रपट म्हणजेच ‘अशी ही आशिकी’. चित्रपटाचे नाव जाणून घेतल्यावर या चित्रपटातील कलाकार कोण हे जाणून घेण्याविषयी प्रेक्षकांची कुतूहलता वाढली. चित्रपटाचे नावंच इतके यंग आणि हटके आहे की या चित्रपटासाठी कलाकारांची निवड पण तितकीच हटके असणार. तर ‘अशी ही आशिकी’मध्ये अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे युथफूल हिरोची भूमिका साकारणार आहे. आता अभिनयची हिरोईन कोण, हे देखील प्रेक्षकांसाठी सुंदर सरप्राईज असेल. प्रेमाच्या महिन्यात अर्थात १४ फेब्रुवारीला ‘अशी ही आशिकी’ चित्रपट प्रेमाचे नवे रंग, नवा अर्थ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.

पाच वर्षानंतर सचिन पिळगावकर दिग्दर्शकाच्या भूमिकेत

‘अशी ही आशिकी’च्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनी सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. दिग्दर्शनासह सचिन यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. तसेच कथा, पटकथा आणि संवाद देखील सचिन पिळगावकर यांचेच आहे. ‘अशी ही आशिकी’चा प्रेमाचा रोमँटिक प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच नवीन अनुभव ठरेल.

चित्रपटाची निर्मिती ‘टी-सीरिज’ आणि ‘सिलेक्ट मिडिया’ यांनी केली

गुलशन कुमार आणि भूषण कुमार प्रस्तुत ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाची निर्मिती ‘टी-सीरिज’ आणि ‘सिलेक्ट मिडिया’ यांनी केली असून सहनिर्मिती सुश्रिया चित्र यांनी केली आहे. वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मनोरंजनाचे माध्यम ठरलेली टी-सीरिज कंपनीने अनेक हिंदी सिनेमे आणि गाणी यांच्यामार्फत प्रेक्षकांची अभिरुची जाणून त्यांच्यासाठी नेहमीच मनोरंजक प्रोजेक्ट्सची निर्मिती केली आहे.

First Published on: October 17, 2018 6:34 PM
Exit mobile version