बिग बॉसमध्ये रंगणार ‘मस्ती कि पाठशाला’

बिग बॉसमध्ये रंगणार ‘मस्ती कि पाठशाला’

(फोटो सौजन्य - कलर्स मराठी)

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज देखील ‘मस्ती कि पाठशाला’ हे कार्य रंगणार आहे. ‘मस्ती कि पाठशाला’ या कार्यामध्ये सोमवारी सई आणि आस्ताद शिक्षकाच्या भूमिकेत दिसले. तर आज देखील हा टास्क घरामध्ये खेळला जाणार आहे. अंदाजे तीन महिने एकत्र राहिल्यानंतर प्रत्येकजण एकमेकांकडून काहीना काही शिकले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांनी शाळे सारख्या अनेक गोष्टी शिकल्या. शाळा म्हंटल की, वर्गामध्ये दबदबा असलेला मॉनिटर, पहिल्या बाकावर बसणारी हुशार मुले, शेवटच्या बेंचवर बसणारी दंगा घालणारी मुले असे नानाविध प्रकारचे विद्यार्थी असतात.

या टास्कमध्ये काही सदस्य विद्यार्थी तर काही सदस्य शिक्षक बनले आहेत. सोमवारी सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केली आणि आज देखील बिग बॉसमधील सदस्य मज्जा करणार आहेत हे नक्की. सई आणि आस्ताद सोमवारी शिक्षक बनले होते. तर आज या टास्कमध्ये घरातील सदस्य काय मज्जा मस्ती करणार हे बघणे रंजक असणार आहे.

(फोटो सौजन्य – कलर्स मराठी)

मेघा, शर्मिष्ठा आणि पुष्कर बनणार शिक्षक

आज टास्कमध्ये मेघा, शर्मिष्ठा आणि पुष्कर हे शिक्षक बनणार आहेत. या एका वेगळ्याप्रकारच्या टास्कमुळे सदस्यांना देखील मज्जा येत आहे. हा टास्क करत असताना सगळ्याच सदस्यांना शाळेची आठवण येत असणार हे निश्चित. आज मेघा शिक्षिका असताना विद्यार्थी बनलेले इतर सदस्य मेघाला बरीच दमछाक करायला लावणार आहेत. शिक्षिका बनलेल्या मेघाला थोडासा त्रास देण्यासाठी सगळे विद्यार्थी बाथरूममध्ये जाणार आहेत. त्यावेळी मेघा देखील त्यांना तिथेच बंद करणार आहे. हे आज प्रेक्षकांना बघायला मिळणार असून हा टास्क बघताना त्यांना बरीच मज्जा देखील येणार आहे. तसेच शर्मिष्ठाच्या वर्गामध्ये सगळे त्यांना आवडणारे चित्र काढणार आहेत. तर पुष्कर देखील शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

First Published on: July 17, 2018 3:08 PM
Exit mobile version