Video : ‘मेरे प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर रिलीज

Video : ‘मेरे प्राईम मिनिस्टर’चा ट्रेलर रिलीज

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय नेते प्रचारासाठी सक्रिय झाले असताना, दुसरीकडे काही बड्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक्सनाही उधाण आलं आहे. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित ‘अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ हा चित्रपट असो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक असलेला ‘पीएम नरेंद्र मोदी’ असो… नाहीतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर येऊ घातलेला ‘माय नेम इज रागा’ हा चित्रपट असो, बॉलीवूडमध्ये सध्या राजकीय नेत्यांच्या बायोपिक्सचा ट्रेंड आला आहे. या सगळ्यापाठोपाठ आता ‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’ हादेखील एक नवीन चित्रपट येऊ घातला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून, सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी चर्चा रंगते आहे. मात्र, ‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’ हा कोणत्या राजकीय नेत्याच्या जीवनावर आधारित चित्रपट नसून, ती काही लहान मुलांची निरागस कथा आहे.  चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक ट्विटरवर शेअर केली आहे.


चित्रपटाची गोष्ट काय?

‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’च्या ट्रेलरमध्ये लहान मुलांची भूमिका लक्षवेधी ठरली आहे. या लहानग्यांची पंतप्रधानांना भेटण्यासाठी सुरु असलेली धडपड आणि या भेटीसाठी ते करत असलेले निरागस प्रयत्न, याची सुंदर गुंफण चित्रपटाच्या गोष्टीत करण्यात आली आहे. आपल्या आईवर झालेल्या अत्याचाराचा जाब विचारण्यासाठी कशाप्रकारे ही मुलं थेट पंतप्रधानांना भेटण्याचा प्रवास सुरु करतात? याची झलक ट्रेलरमधून पाहायला मिळते. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ‘मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यााआधी त्यांनी ‘रंग दे बसंती’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘मिर्ज्या’ आणि ‘दिल्ली ६’ या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.

दरम्यान, या चित्रपटातून 

First Published on: February 11, 2019 2:39 PM
Exit mobile version