तो मला जबरदस्ती जवळ ओढायचा; सेक्रेड गेम्समधील अभिनेत्रीचा आरोप

तो मला जबरदस्ती जवळ ओढायचा; सेक्रेड गेम्समधील अभिनेत्रीचा आरोप

दिग्दर्शक विपुल शहा आणि अभिनेत्री एल्नाज

‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमध्ये भूमिका साकारणाऱ्या ईराणी अभिनेत्री एल्नाज नौरोझी हिने दिग्दर्शक, निर्माता विपुल शहा यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. बॉलीवूडमध्ये सुरु असलेल्या मीटू मोहिमेत आता परदेशी अभिनेत्रींनीही आपल्यावरील झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यास सुरुवात केली आहे. एल्नाजने तिचा हा अनुभव दैनिक ‘मिड डे’ सोबत शेअर केला आहे. आपण जेव्हा जेव्हा विपुल शहा यांच्या ऑफीसमध्ये गेलो आहोत, तेव्हा तेव्हा त्यांनी मला किस करण्याचा प्रयत्न केला असल्याचे एल्नाजने म्हटले आहे. आज विपुल शहा यांचा नमस्ते इंग्लंड हा चित्रपट प्रदर्शीत झाला असून या चित्रपटात एक भूमिका आपल्या मिळणार होती असेही तिने म्हटले आहे.

‘नमस्ते इंग्लंड’मध्ये रोल ऑफर 

नमस्ते इंग्लंड चित्रपटाच्या चित्रीकरणाआधी तिच्या मॅनेजरने तिला सांगितले की तिला प्रमुख भूमिका साकारणाऱ्या परिणिती चोप्रानंतरची दुसरी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारायची आहे. हीच भूमिका आधी जॅकलिन फर्नांडीस हिलादेखील ऑफर करण्यात आली होती. यासाठी जेव्हा एल्नाज विपुल शहांना भेटण्याकरता त्यांच्या ऑफीसमध्ये गेली तेव्हा तिला हा वाईट अनुभव आला. माझ्या भूमिकेसाठी लुक टेस्ट झाल्यांनतर पेपर साईन केले जातील, असे विपुल शहा म्हणाले होते. त्यानंतर काही दिवसांनी वर्सोवा बिचवर माझी ऑडीशन घेण्यात आली.

मीटू मोहिमेत एल्नाजचा मोठा खुलासा

मात्र विपुल शहा समाधानी नव्हते, त्यांनी मला पुन्हा एकदा त्यांच्या ऑफीसमध्ये भेटण्यासाठी बोलावले. परंतू तिथून जाताना विपुल शहा तिच्या जवळ आले आणि तिला किस करण्याचा प्रयत्न केला, असे एल्नाज सांगते. सध्या मीटू मोहिमे अंतर्गत बॉलीवूडमध्ये बरेच प्रकरणं उघड केली जात आहेत. त्यामध्ये आता परदेशी अभिनेत्रीनेही बॉलीवूड दिग्दर्शकावर गंभीर आरोप केला आहे.

First Published on: October 19, 2018 10:43 AM
Exit mobile version