‘हा’ मराठमोळा मॉडेल होता आरएसएसचा सदस्य

‘हा’ मराठमोळा मॉडेल होता आरएसएसचा सदस्य

मराठमोळा मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण

फिटनेसमुळे कायम तरुण मंडळी आणि मुलींच्या पसंतीस उतरलेला. आपल्या वयापेक्षा लहान असलेल्या बायकोसोबत हा अभिनेता सोशल मीडियावर नेहमीच ट्रोल होत आला आहे. अभिनेता मिलिंद सोमण नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत राहिला आहे. आता त्याच्या चर्चेत येण्याचा विषय म्हणजे मिलिंद सोमण यांच्या आयुष्याशी निगडित पुस्तक. ‘मेड इन इंडिया : मेमरी बाय मिलिंद सोमण विथ रूपा राय’. हे पुस्तक सध्या ऑनलाईन वाचण्यासाठी उपलब्ध आहे. संबंधित पुस्तकाविषयीची पोस्ट मिलिंद सोमण याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केली आहे. हे पुस्तक म्हणजे माझ्या तरुणपणातील माझ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील (RSS) माझ्या आठवणी आहेत, असं त्याने म्हटलं आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून त्यांनी बऱ्याच जुन्या आठवणीही शेअर केल्या आहेत.

आज मी मीडियामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवा संघाबद्दलच्या बातम्या वाचतो तेव्हा मी चकीत होतो. मी जेव्हा आरएसएस मध्ये होतो तेव्हाचे आरएसएस खूप वेगळे होते. तेव्हा आम्ही दररोज वेगवेगळ्या शाखेत शिकायला जायचो. तेव्हा शिकवलेले मला आजही लक्षात आहे. आम्ही खाकी पॅन्ट वर शाखेत जायचो. गाणी म्हणायचो, योगासने करायचो, संस्कृत श्लोक म्हणायचो. मुलांना थंड हवेच्या ठिकाणी ट्रेकिंगला घेऊन जायचे. शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासाठी आम्हाला योगासने शिकवली जात. मी फिट अॅन्ड फाइन होण्यामध्ये आरएसएसचा महत्त्वाचा वाटा आहे.

आपला मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवासंघात गेल्यावर तो हुशार आणि शिस्तबद्ध होईल. त्याला चांगले वळण लागेल. असं माझ्या बाबांच मत होत म्हणून मी स्वयंसेवा संघात शिकायला गेलो. माझे बाबा ही संघाचा भाग होते आणि हिंदु होते याचा त्यांना सार्थ अभिमान होता. शाखेत गेलेल्यांचे हिंदू बद्दल काय विचार होते याबद्दल मला माहिती नाही. परंतु त्यांनी कधीच त्यांचे विचार आमच्यावर लादले नाहीत. मिलिंद सोमण यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक आठवणी त्यांनी या पुस्तकात सांगितल्या आहेत.


हेही वाचा – करोनामुळे केरळमधील सिनेमागृहे बंद


 

First Published on: March 11, 2020 4:02 PM
Exit mobile version