इमेज बनवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं, अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका

इमेज बनवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं, अनुपम खेर यांची मोदी सरकारवर टीका

अनुपम खेर

अभिनेता अनुपम खेर अनेकदा नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांचे कौतुक करताना दिसले आहेत. कोरोना महामारीने देशावर मोठं संकट ओढावलं असताना सोशल मीडियावर अनेक युजर्स केंद्र सरकारवर टीका करतांना दिसताय. आता अनुपम खेर यांनी देखील आता नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. अनुपम खेर यांनी असे म्हटले, कोविडशी लढण्यात सरकार कुठेतरी अपयशी ठरले आहे.

सोशल मीडिया युजर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत तर अनुपम खेर सध्या ट्विटरवर चांगलेच ट्रेंड करत आहेत. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अनुपम खेर म्हणाले, आपली इमेज निर्माण करण्यापेक्षा सरकारने लोकांचा अधिक जीव वाचवण्यावर भर देण्याची गरज आहे. कुठेतरी केंद्र सरकार अपयशी ठरले आहेत. प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा लोकांचे जीवन हे सर्वात महत्त्वाचे आहे हे त्यांना सद्यस्थितीत समजले पाहिजे.’

तसेच,अनुपम खेर असेही म्हणाले की, सरकारवर केलेली टीका यावेळी योग्य आहे. ‘मला असे वाटते की अनेक बाबतीत ही टीका योग्य आहे. लोकांनी ज्या कामासाठी त्यांना निवडले आहे ते सरकारने केले पाहिजे. माझ्या मते पाण्यात तरंगणाऱ्या मृतदेहांना पाहून कोणी निर्दयी माणून प्रभावित नाही होणार. परंतु इतर राजकीय पक्ष याचा स्वत: च्या फायद्यासाठी वापर करत आहेत, तेही योग्य नाही. ‘अनुपम खेर हे बर्‍याच वेळा सांगतात की ते भाजपचे समर्थक आहेत आणि त्यांची पत्नी किरण खेर ही देखील भाजप खासदारही आहेत, अशा प्रकारे त्यांच्या वक्तव्याने सोशल मीडियावरील युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर युजर्सने सुद्धा त्यांना चांगल्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही युजर्स असेही म्हणताय की, अनुपम खेर जरी मोदींवर टीका करत असले तरी त्यांच्या मनात ‘मोदीच येणार’ असे सुरू असेल.

 

First Published on: May 13, 2021 1:53 PM
Exit mobile version