‘८३’ या चित्रपटात हा अभिनेता दिसणार

‘८३’ या चित्रपटात हा अभिनेता दिसणार

'८३’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस

बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा १९८३ च्या किक्रेट विश्वचषक विजयावर आधारीत ‘८३’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. तर माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा साकारणार आहे. मात्र या चित्रपटातील आणखी एक नाव पुढे आलं आहे. या चित्रपटात साहील खट्टर ही एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

या दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

२५ जून १९८३ ला लंडनमधील लॉर्डसच्या मैदानावर भारतीय संघाने किक्रेट विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे केवळ देशातून नाही तर संपूर्ण जगातून भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक झाले. त्यामुळे ही तारीख भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरली गेली. याच विजयावर ‘८३’ हा चित्रपट आधारीत आहे. हा चित्रपट येण्यासाठी तब्बल २ वर्षं वाट पहावी लागणार असून हा चित्रपट २०२० च्या १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

सैय़्यद किरमानीच्या भूमिकेत दिसणार साहिल

दिग्दर्शक कबीर खान या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटामध्ये आतापर्यंत रणवीर सिंह आणि जीवा कोणती भूमिका साकारणार हे आधिपासूनच प्रेक्षकांना माहित होतं. त्यानंतर आता आणखी एका भूमिकेचा खुलासा झाला आहे. या चित्रपटामध्ये भारताचा माजी यष्टीरक्षक सैय़्यद किरमानी याची भूमिका साहिल खट्टर साकारणार आहे.

ट्विटरवरून दिली माहिती

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विट करत साहिल सयैद किरमानींची भूमिका साकारणार असल्याची माहिती दिली आहे. साहिल हा युट्यूबर, सुत्रसंचालक आणि अभिनेता आहे. या चित्रपटातील एक एक भूमिका समोर येत आहेत, आणखी कोणकोण कलाकार यात दिससणार हे लवकरच प्रेक्षकांसमोर येईल.

First Published on: February 2, 2019 2:18 PM
Exit mobile version