लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृती दिनाला ‘मृदगंध पुरस्कार’

लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृती दिनाला ‘मृदगंध पुरस्कार’

लोकशाहीर विठ्ठल उमप (सौजन्य-विकीपीडिया)

लोकशाहीर विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी स्मृती संगीत समारोह आणि मृदगंध पुरस्काराचे आयोजन केले जाते. लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा २६ नोव्हेंबर रोजी स्मृतीदिन असतो. या स्मृतीदिनानिमित्त संगीत समारोहासोबतच कला, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विठ्ठल उमप फाऊंडेशनच्या वतीने मान्यवरांना ‘मृदगंध पुरस्कार’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन सन्मान केले जाते.

या मान्यवरांना मिळाले आहेत पुरस्कार 

आतापर्यंत ज्येष्ठ साहित्यिक अरुणाताई ढेरे, शास्त्रीय नृत्य (कथ्थक) डॉ. मंजिरी देव, पत्रकार-लेखक जयंत पवार, अभिनेता सुबोध भावे, ढोलकी सम्राट राजाराम जामसंडेकर अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. तर पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर, पं. रोणू मजुमदार, मयुर वैद्य, आदिती भागवत, गणेश चंदनशीवे, पं. तौफिक कुरेशी, आरती अंकलीकर टिकेकर, पं. रविंद्र चारी, शर्वरी जमेनीस, पं. शौनक अभिषेकी, शकुंतलाबाई नगरकर यांचा संगीत समारोहामध्ये सहभाग लाभला आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे सुपुत्र नंदेश उमप हे गेली सात वर्ष हा उपक्रम राबवत आहेत. यंदाचे हे पुरस्काराचे आठवे वर्ष असून २६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिर सभागृहात आठव्या स्मृती संगीत समारोह आणि मृदगंध पुरस्काराच समारंभ पार पडणार आहे.

First Published on: November 16, 2018 11:45 AM
Exit mobile version