मृणाल ठाकूरचा बॉलीवूडमध्ये बोलबाला

मृणाल ठाकूरचा बॉलीवूडमध्ये बोलबाला

मृणाल ठाकूर (सौजन्य-इंस्टाग्राम)

छोट्या पडद्यावरील मालिकेपासून अभिनयाची सुरूवात केलेल्या अभिनेत्री मृणाल ठाकूरला हिंदी चित्रपटांमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिकांची ऑफर मिळत आहे. हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ नंतर आता मृणार जॉन अब्राहमच्या ‘बाल्टा हाऊस’ चित्रपटातही प्रमुख व्यक्तिरेखेत दिसणार आहे. अभिनेता जॉन अब्राहम या चित्रपटात डीसीपी संजीव कुमार यादव यांची भूमिका साकारत असून या चित्रपटाचे दिग्दर्शन निखील अडवानी यांनी केले आहे. ‘बाल्टा हाऊस’मध्ये मृणाल ठाकूर ही जॉन अब्राहमच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. नंदिता असे मृणालच्या भूमिकेचे नाव असून पत्रकार शोभना यादव यांच्यावर आधारीत ही भूमिका आहे. एका एन्काऊंटर स्पेशालिस्टच्या जीवनावर आधारीत या चित्रपटाची कथा असून हा चित्रपट पुढील वर्षी १५ ऑगस्ट २०१९ ला प्रदर्शीत होणार आहे.

मृणार ठाकूर आणि जॉन अब्राहम (सौजन्य-फिल्मफेअर)

एकता कपूरच्या मालिकेतील भूमिका 

मृणाल ठाकूरनेही छोट्या पडद्यावर सुरु असलेल्या ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या प्रग्या या व्यक्तीरेखेच्या बहिणीची भूमिका मृणालने साकारली होती. डेली सोपची क्विन एकता कपूर हिची ही मालिका आजही लोकप्रीयतेच्या शिखरावर आहे. मात्र मधेच ही मालिका सोडून मृणालने चित्रपटांमध्ये पदार्पण केले. नुकताच तिचा ‘लव्ह सोनिया’ हा चित्रपट प्रदर्शीत झाला असून लवकरच तिचा हृतिक रोशनसोबतचा ‘सुपर ३०’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

First Published on: October 16, 2018 12:36 PM
Exit mobile version