आली लहर केला कहर, धोनीसाठी बाथरूममध्येच बसले सिंगर!

आली लहर केला कहर, धोनीसाठी बाथरूममध्येच बसले सिंगर!

आली लहर केला कहर, धोनीसाठी बाथरूममध्येच बसले सिंगर!

महेंद्रसिंग धोनी बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. महेंद्रसिंग धोनीने शेवटचा सामना आयसीसी वर्ल्डकप २०१९ ला न्यूझीलंड विरोधात खेळला. मात्र धोनी फक्त उक्तृष्ट फलंदाजीसाठीच नाही तर गाण्यासाठी देखील ओळखला जातो. सोशल मिडीयावर अनेकदा धोनीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातच यावेळी धोनीचा बाथरूम मधला एक व्हिडिओ व्हयरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये धोनी, पार्थिव पटेल आणि पियुष चावला बाथरूमच्या आत बसले आहेत. हे तिघे गात नाहीत, परंतु त्यांचा मित्र ईशान खान हा किशोर कुमार यांचे गाणे गाताना दिसत आहे. इशान खान धोनीसाठी ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ हे गाणे गात आहे, ज्यात धोनी खूप एन्जॉय करताना दिसत आहे.

First Published on: February 19, 2020 5:46 PM
Exit mobile version