सनी लिओनच्या गाडीच्या नंबरचा गैरवापर, मुंबईतून तरुणाला अटक

सनी लिओनच्या गाडीच्या नंबरचा गैरवापर, मुंबईतून तरुणाला अटक

Sunny Leone : सनी लिओनीची ऑनलाईन फसवणूक, सिबिल स्कोर झाला खराब, काय आहे प्रकरण?

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनच्या गाडीच्या नंबरचा गैरवापर केल्याप्रकरणी मुंबईतून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. सनीच्या गाडीचा नंबर वापरुन हा तरुण नियमांचे उल्लंघन करत होता. (Mumbai Man booked for allegedly breaking traffic rules misusing Sunny Leone Car Number) कल्याणमधील एक तरुण सनीच्या गाडीचा नंबर वापरुन मुंबईच्या रस्त्यावर फिरत होता. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२० पासून MH 05 CT 1010 या अभिनेत्री सनी लिओनीच्या कार नंबरचा गैरवापर करुन एका वाहनचालक तरुण वाहतूक नियमांचे उल्लंघन करत होता. याच तरुणाने वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याची एक नोटीस सनी लिओनच्या घरच्या पत्त्यावर आली होती. पण त्यावेळी सनी उपस्थित नव्हती, ही बाब लक्षात आल्यानंतर पती डॅनिअल वेबर यांच्या मॅनेजरने या विषयी जुहू पोलिस स्थानक आणि वरळी वाहतूक विभागात तक्रार केली होती.

यानंतर मंगळवारी दुपारी 2 वाजता सनी लियोनीचा गाडी ड्रायव्हर अकबर खानने त्यांच्या गाडीप्रमाणे दिसणारी एक गाडी वर्सोवा परिसरातील कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलजवळ पाहिली. ज्या गाडीवर सेम क्रमांक होता. त्यानंतर डीएन नगर वाहतूक विभागातील कॉन्सटेबल या ठिकाणी गेले. तर दोन्ही गाडीवर सेम क्रमांक असल्याचे आढळले. याप्रकरणी पियुष रामेश्वर नामक तरुणाला अटक करण्यात आली आहे.

यावेळी पियूष सेन यांना डीएन नगर वाहतूक विभागात आण्यात आले. त्यावेळी त्याच्याकडे गाडीचे कागदपत्रांविषयी विचारणा करण्यात आली. परंतु त्यांच्याकडे गाडीचे पेपर नव्हते. चौकशीदरम्यान पियूष सेन याने कबुली दिली की, गाडीवरील जो क्रमांक ते वापरत आहे, तो त्यांच्या गाडीचा क्रमांक नाही. दरम्यान पोलिसांनी सनीचे पती डॅनिअल यांना देखील गाडीचे कागपत्र दाखविण्यास सांगितले, यावेळी डॅनिअल यांच्याकडे गाडीचे अधिकृत कागदपत्रा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी सेन याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.


हेही वाचा- देशात जॉन जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या तिसऱ्या लसीला मंजुरी मिळणार ?

 

First Published on: February 25, 2021 9:15 AM
Exit mobile version