‘मुन्ना भाई ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सर्किटने दिली गुड न्यूज!

‘मुन्ना भाई ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सर्किटने दिली गुड न्यूज!

'मुन्ना भाई ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सर्किटने दिली गुड न्यूज!

बऱ्याच दिवसांपासून राजकुमार हिरानीचा सर्वात मोठा चित्रपट ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस’चा तिसरा पार्ट येणार असल्याची चर्चा आहे. तसेच चाहते देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे. पण आता ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस’ चित्रपटमधील सर्किटची भूमिका करणारा अर्शद वारसीने इंट्रेस्टिंग खुलासा केला आहे. अर्शदने एका न्यूज पोर्टलला ‘मुन्ना भाई ३’बाबत मोठी माहिती दिली आहे. त्याने केलेला हा खुलासा चाहत्यांना खुश करू शकतो.

फेब्रुवारी महिन्यात अशी बातमी समोर आली की, मुन्ना भाईच्या मेकर्सने चित्रपटाची आइडिया केली आहे आणि लवकरच यावर काम सुरू केले जाऊ शकते. परंतु तेव्हा संजय दत्तच्या प्रकृतीमुळे चित्रपटाचे काम पुढे ढकलले. २००३मध्ये ‘मुन्ना भाई’ सीरिजची सुरुवात झाली होती. यानंतर चित्रपटाचा सेकेंड पार्टपण आला होता, जो सुपरहिट झाला होता. त्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढत गेली, परंतु ‘मुन्ना भाई ३’ केव्हाच प्रदर्शित झाला नाही.


हेही वाचा – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट ‘खिसा’ची छाप


 

First Published on: December 27, 2020 3:16 PM
Exit mobile version