Grammy Awards 2022 : संगीतकार AR Rehman ची मुलासह ग्रॅमी अवॉर्ड शोमध्ये हजेरी

Grammy Awards 2022 : संगीतकार AR Rehman ची मुलासह ग्रॅमी अवॉर्ड शोमध्ये हजेरी

Grammy Awards 2022 : संगीतकार AR Rehman ने मुलगा Ameen सह ग्रॅमी अवॉर्ड शोमध्ये घेतली एन्ट्री; पाहा फोटो

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानने यंदा 64 व्या ग्रॅमी अवॉर्ड शोमध्ये मुलगा एआर अमीनसह एन्ट्री घेतली. दोन वेळा ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा रेहमान याने या अवॉर्ड शोमधील काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.रहमानने मुलगा अमीनसोबतचा फोटो शेअर करत ‘ग्रॅमी’ असे लिहिले. 55 वर्षीय संगीतकार रहमान आणि मुलगा अमीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘रेड कार्पेट’वरील काही फोटो देखील शेअर केली आहेत. तर अमीन (19) यानेही त्याच्या इंस्टाग्रामवर ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.

R&B सुपरडुओ सिल्क सोनिकच्या “लीव्ह द डोर ओपन” या गाण्याने या वर्षीच्या ग्रॅमीमध्ये ‘सॉन्ग ऑफ द इयर’ पुरस्कार जिंकला. ब्रुनो मार्स आणि रॅपर अँडरसन पाक यांनी हे गाणे गायलेय.

यावर्षी न्यूयॉर्कस्थित भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाह आणि बेंगळुरूस्थित संगीतकार रिकी केज यांनाही ग्रॅमी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शाह यांना ‘अ कलरफुल वर्ल्ड’ या अल्बमसाठी बेस्ट चिल्ड्रन्स म्युझिक अल्बम ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याच वेळी, केजला ‘डिव्हाईन टाइड्स’साठी बेस्ट न्यू एज अल्बम’ म्हणून ग्रॅमी पुरस्कार जिंकला. रिकी केज याचा दुसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्काराने गौरव करण्यात आले आहे.

मात्र ऑस्करप्रमाणे यंदा ग्रॅमी पुरस्कार 2022 मध्येही प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर आणि गायक बप्पी लाहिरी यांना इन मेमोरिअम विभागात श्रद्धांजली वाहण्यात आलेली नाही. लता मंगेशकर आणि बप्पी लाहिरीच्या आठवणींना 94 व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात इन मेमोरिअमध्ये उजाळा देण्यात आलेला नाही. त्यामुळे भारतीयांकडून ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यावर नाराजी व्यक्त केली जातेय.

यंदा अमेरिकेतील लास वेगास येथे 64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा पार पडला. अमेरिकन संगीतकार क्रिस स्टेपलटनने 2022 च्या ग्रॅमी अवॉर्ड्समध्ये बेस्ट कंट्री अल्बमचा पुरस्कार जिंकला आहे. याशिवाय क्रिस स्टॅपलटनने ‘यू शुड प्रोबॅबली लीव्ह’साठी बेस्ट कंट्री सोलो परफॉर्मन्स आणि ‘कोल्ड’साठी बेस्ट कंट्री साँगचा पुरस्कारही जिंकला. 64 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये 11 श्रेणींमध्ये नामांकन झाल्यानंतर संगीतकार जॉन बॅटिस्टने चार ग्रॅमी पुरस्कार जिंकले. तर रॅपर बेबी केमने ‘फॅमिली टाईज’साठी बेस्ट रॅपचा पुरस्कार मिळाला आहे.


Grammy Awards 2022 : भारतीय वंशाच्या फाल्गुनी शाह, रिकी केजने प्रतिष्ठित ‘ग्रॅमी पुरस्कार’वर कोरले नाव

First Published on: April 5, 2022 9:48 AM
Exit mobile version