…यामुळे संगीतकार ए.आर.रहमान यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिळत नाही काम!

…यामुळे संगीतकार ए.आर.रहमान यांना फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिळत नाही काम!

...यामुळे संगीतकार ए.आर.रहमान यांना फिल्म इंटस्ट्रीमध्ये मिळत नाही काम!

ऑस्कर विजेता भारतातील सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेला चित्रपट ‘दिल बेचारा’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. दरम्यान एक गँग ए.आर. रहमान विषयी अफवा पसरवत आहे आणि यामुळे त्यांना हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळत नाही आहे, असा खुलासा स्वतः ए.आर.रहमान यांनी केला आहे.

एका मुलाखतीत ए.आर. रहमान यांना विचारले होते की, ‘तामिळ चित्रपटाची अपेक्षा आणि हिंदी चित्रपटात कमी काम का करता?’ त्याचे उत्तर देताना रहमान म्हणाले की, ‘मी चांगल्या चित्रपटांना नाकारत नाही. परंतु मला असे वाटते की, अशी एखादी गँग आहे जी गैरसमजांमुळे माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवत आहे. मुकेश छाब्रा माझ्याकडे आला आणि मी दोन दिवसांत त्यांना गाणी तयार करू दिली.’

‘त्यावेळेस त्यांनी मला सांगितले की, सर किती जणांनी जाऊ नका, त्यांच्या जवळ जाऊ नका असे सांगितले. तसेच त्यांनी मला अनेक गोष्टी सांगितल्या. त्यावेळेस मी त्या गोष्टी फक्त ऐकल्या आणि विचार केला, ठीक आहे. आता मला समजले की, मला का कमी काम मिळत आहे आणि चांगले चित्रपट माझ्यापर्यंत का येत नाहीत?’

नशिबावर विश्वास ठेवतो

पुढे रहमान म्हणाले की, ‘मी डार्क फिल्म करतो कारण एक संपूर्ण गँग माझ्याविरोधात काम करत आहेत. काही विचार न करता ते माझे नुकसान करत आहेत. माझ्यासोबत काम करण्याची लोकांची इच्छा आहे पण अनेक लोक आहे यांची इच्छा माझ्यासोबत काम करण्याची नाही आहे. पण ठीक आहे, मी नशिबावर विश्वास ठेवतो आणि माझा विश्वास आहे की सर्व काही ईश्वरद्वारे आपल्याकडे येते.’


हेही वाचा – पाहा सुशांतच्या ‘दिल बेचारा’ चित्रपटातील Best Scenes Photos


 

 

First Published on: July 25, 2020 7:45 PM
Exit mobile version