My Mad Husband… अनिल कपूरच्या पत्नीने शेअर केला लग्नाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ

My Mad Husband… अनिल कपूरच्या पत्नीने शेअर केला लग्नाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ

My Mad Husband... अनिल कपूरच्या पत्नीने शेअर केला लग्नाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ

बॉलिवूड फॉरेवर यंग अॅक्टर म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अनिल कपूर आणि पत्नी सुनीता कपूर यांनी 19 मे रोजी आपल्या लग्नाचा 37 वा वाढदिवस साजरा केला. या दिवसाचे अवचित्त साधून दोघांनीही मजेशीर अंदाजात सोशल मीडियाद्वारे एकमेकांना शुभेच्छा दिल्या. इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत संगितले की दोघेही एकमेकांसाठी किती खास आहेत. अभिनेता अनिल कपूर याने दोघांचेही काही अनसिन फोटो शेअर केले तर सुनीताने इंस्टावर अनिल सोबत एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्ट मध्ये अनिल कपूर अगदी गुंग होऊन मैफिलीचा आनंद लुटत आहे. अनिल त्यांच्या प्रसिद्ध डान्स सॉन्ग पैकी असलेल्या ‘रमता जोगी’ या गाण्यावर नाचत आहे. अनिलचा डान्स पाहून बाजूला असणारे सगळी मनसे अनिल यांना चेयरप करत आहे. आणि हा फणी व्हिडिओ शेअर करत सुनीता यांनी “माझा पागल आणि क्रेझी नवरा. हे 37 वर्ष शानदार बनवण्यासाठी धन्यवाद. माझे असचं मनोरंजन करत रहा. खूप सारं प्रेम.”

अनिल कपूर यानेही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुनीता तसेच आपल्या संपूर्ण कुटुंबासोबतच एक पोस्ट शेअर करत लिहले आहे की,” आपल्या प्रेम कहाणी समोर सगळ्या प्रेम कहाणी आणि प्रेमाचे शब्द खूप लहान भासतात. माला माहीत आहे तू माझ्या सोबत असते तेव्हा  सुरक्षित,प्रेम आणि आनंद दरवळत असतो. तू आमच्या कुटुंबाचा मजबूत खांब आहे. मला  माहिती नाही जर तू आमच्या आयुष्यात नसणार  तर आम्ही काय करू. संपूर्ण आयुष्य तुला खूप प्रेम आणि आदर देत राहील याची तू पात्र आहेस. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!”


हे हि वाचा – ‘महारानी’साठी हुमा कुरेशीने धारण केला नवा लुक,मुख्यमंत्रीच्या भूमिकेत झळकणार हुमा!!

First Published on: May 20, 2021 4:02 PM
Exit mobile version