नसिरुद्दीन शहा अनुपम खेर यांच्यावर नाराज

नसिरुद्दीन शहा अनुपम खेर यांच्यावर नाराज

नसरूद्दीन शहा यांचा अनुपम खेर यांच्यावर टीका

अभिनेते नसिरुद्दीन शहा जितके आपल्या उत्कृष्ट भूमिकांमुळे प्रसिद्ध आहेत तितकेच ते त्यांच्या वादग्रस्त प्रतिक्रियांमुळेही कायम चर्चेत असतात. यावेळी त्यांनी आपले सहकारी कलाकार अनुपम खेर यांच्यावर निशाणा साधला आहे. अनुपम खेर हे एफटीआयचे (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) अध्यक्ष आहेत.

अनुपम खेर यांच्या एफटीआयमधील हजेरीवर नसिरुद्दीन शहा यांनी प्रश्न उठवला आहे. नसिरुद्दीन शहा अनुपमखेर यांच्याबद्दल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, “अनुपम खेर कुठे आहेत? मी त्यांच्या कामावर काहीच प्रतिक्रीया देऊ शकत नाही. ते कधीतरीच एफटीआयमध्ये बघायला मिळतात. मला नाही वाटत की २ दिवसांपेक्षा जास्त ते एफटीआयमध्ये आले असतील. मी कायम मुलांना लेक्चर देण्याच्या निमित्ताने एफटीआयमध्ये येत असतो. मला असं समजलं आहे की अनुपम खेर फार एफटीआयमध्ये येत नाहीत. जर ते जास्त वेळ इथे थांबले तर त्यांचं काम आम्हाला बघायला मिळेल. तेव्हाच आम्ही त्यांच्या कामावर प्रतिक्रिया देऊ”.

आजपर्यंत दहाहून अधिक चित्रपटांमध्ये नसिरुद्दीन शहा आणि अनुपम खेर यांनी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या दोघांनीही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतलं आहे. अनुपम खेर यांच्या आधी गजेंद्र चौहान नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष होते. त्यांच्या अनेक निर्णयांवरून वाद झाले होते.

First Published on: August 30, 2018 5:49 PM
Exit mobile version