राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

मराठी सिनेसृष्टीसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागातील मान्यवरांना दरवर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार शंतनु गणेश रोडे दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ (gosht eka paithanichi) या चित्रपटाला प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (president draupadi murmu )यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

दरम्यान या खास दिवसाचे औचित्य साधून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या २ डिसेंबर रोजी ‘गोष्ट एका पैठणीची हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स आणि लेकसाईड प्रॉडक्शनची निर्मिती या चित्रपटाला आहे. सायली संजीव (sayali sanjeev), सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी (mrunal kulkarani), मिलिंद गुणाजी, शशांक केतकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहे.

या चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल दिग्दर्शक शंतनू रोडे म्हणाले, ‘आज या चित्रपटासाठी आम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनासाची तारीख जाहीर करण्यासाठी आजच्यापेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असूच शकत नाही. हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे. एका छोट्याशा गावात घडणारी ही गोड कथा आहे. चित्रपट बनवला तेव्हा हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत मजल मारेल, याची आम्हला जराही कल्पना नव्हती. प्रत्येक जण आपल्या उराशी एक स्वप्न बाळगून असतो आणि त्या स्वप्नांनाची पूर्तता करणारा हा नक्षीदार प्रवास म्हणजे ‘गोष्ट एका पैठणीची’. खरंतर या चित्रपटाचा भाग असलेला प्रत्येक व्यक्ती या पुरस्काराचा मानकरी आहे’. दरम्यान हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेकक्षसुद्धा उत्सुक आहेत.


हे ही वाचा – ‘गोष्ट एका पैठणीची’ आणि ‘जून’ चित्रपटाचं कौतुक; कलाकारांच्या आनंदित प्रतिक्रिया

First Published on: September 30, 2022 5:09 PM
Exit mobile version