‘नाटू नाटू’ने पटकावला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’; शाहरुखसहित बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

‘नाटू नाटू’ने पटकावला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’; शाहरुखसहित बॉलिवूड कलाकारांनी दिल्या शुभेच्छा

साऊथ सुपरस्टार रामचरण आणि ज्यूनिअर एनटीआरच्या RRR चित्रपटाने आपली ताकद फक्त भारतीय बॉक्स ऑफिसवरच नाही तर संपूर्ण जगभरात दाखवली. या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांच्या मनात मानाचे स्थान मिळवले. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला ऑस्करमध्ये नामांकन मिळालं होतं. दरम्यान, आता या गाण्याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’ देण्यात आला आहे. या आनंदाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटाच्या टीमसोबतच भारतीय प्रेक्षक देखील आनंदी झाले आहेत. भारतामध्ये जवळपास दोन दशकांनंतर हा पुरस्कार आला आहे. या गाण्याचे संगीतकार एमएम कीरावानी हा पुरस्कार घेण्यासाठी स्वतः स्टेजवर पोहोचले होते. यावेळचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यात राम चरण, ज्यूनिअर एनटीआर आणि एसएस राजामौली देखील उपस्थित होते. ‘नाटू नाटू’ गाण्याला ‘गोल्डन ग्लोब पुरस्कार’जाहिर होताच सर्वंचजण आनंदीत झाले. गोल्डन ग्लोब पुरस्कार कॅलिफॉर्नियामधील बवर्ली हिल्समध्ये असलेल्या बवर्ली हिल्टनमध्ये आयोजित करण्यात आला होता. या वेळी जगभरातील चित्रपटांची स्पर्धा होत आहे. दरम्यान, सध्या यावेळीचा व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर नेटकरीच नाही तर अनेक बॉलिवूड कलाकार देखील शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

शाहरुख खानची प्रतिक्रिया

अजय देवगणची प्रतिक्रिया

 आलिया भट्टने दिल्या शुभेच्छा

First Published on: January 11, 2023 12:23 PM
Exit mobile version