नवाझुद्दीन सिद्दीकी गायनातही आजमावणार नशीब

नवाझुद्दीन सिद्दीकी गायनातही आजमावणार नशीब

नवाझुद्दीन सिद्दीकी गायनातही आजमावणार नशीब

अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकी ने आपल्या अभिनयाने कोणत्याही सामान्य भूमिकेमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडतो. एखादी भूमिका अत्यंत प्रभावी बनण्यामध्ये त्याचा हातखंड आहे असे बोलले तरी वावगे ठरणार नाही. दमदार अभिनयाबरोबरच नवाज आता एका गायकाच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतच नवाज ने त्याचा आगामी चित्रपट ‘बोले चूड़िया’ मधील ‘स्वैगी चूड़िया’ हे गाणं प्रदर्शित केल आहे. या गाण्यातून त्याने एका गायन क्षेत्रात प्रदार्पण केल आहे. यामुळे नवाजच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढत आहे.

काही दिवसांपूर्वी नवाजचा म्यूजिक अल्बम ‘बारीश की जाये’ प्रदर्शित करण्यात आला होता. यात नावाजच्या म्युजिक अल्बमला काही दिवसातच लाखो लाईक्स आणि हजारो कमेंट्स चा वर्षाव झाला आहे. प्रेक्षकांनी त्याच्या या अल्बमला भरभरुन प्रतिसाद दिला होता. नवाज दरवेळेस काही धमाकेदार सर्प्राइज घेऊन असतो. आता नवाज ने गायलेल्या गाण्याने प्रेक्षकांना सुखद धक्का बसला असेल हे नक्की. त्यामुळे नवाजच्या या आगामी गाण्याबाबत सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. नवाझुद्दिन सिद्दिकीने अमीर खानच्या सफरोश या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. नेटफ्लिक्सवरील ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरीजमधील गणेश गायतोंडे या भूमिकेने प्रेक्षकांना भुरळ पाडली. त्याचबरोबर, ‘ठाकरे’ चित्रपटात त्याने साकारलेली बाळासाहेब ठाकरेंची भूमिकाही प्रेक्षकांना आवडली. यापूर्वी त्यांनी २०१७ साली ‘बाबूमोशाय बंदुकबाज’ या अॅक्शन चित्रपटात काम केलं होतं.


हे हि वाचा –मृणाल ठाकुरची बाहुबलीमधून हकालपट्टी, शिवगामीच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

First Published on: April 20, 2021 4:11 PM
Exit mobile version