कोरिओग्राफर शक्ती मोहन नीरज चोप्राच्या पडली प्रेमात

कोरिओग्राफर शक्ती मोहन नीरज चोप्राच्या पडली प्रेमात

कोरिओग्राफर शक्ती मोहन नीरज चोप्राच्या पडली प्रेमात

टोक्यो ऑलिंम्पिक स्पर्धेत भारताला भालाफेक स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक जिंकून देणारा खेळाडू नीरज चोप्राची सध्या जोरदार चर्चा आहे. अगदी जाहिरातींपासून ते टीव्ही शोमध्ये नीरज झळकताना दिसतोय. त्यामुळे तरुणींसाठी नीरज चोप्रा एक नॅशनल क्रश बनला आहे. यातच आता नीरजने एका सेलिब्रिटीला प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे नीरजच्या चाहत्या असलेल्या तरुणी नाराज होऊ शकतात.

नीरजने नुकतीच ‘डान्स प्लस ६’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोच्या एक प्रोमो सध्या जोरदार व्हायरल होतोय. या प्रोमोतील खास एपिसोडमधील नीरज चोप्रा कोरिओग्राफर शक्ती मोहनला प्रपोज करताना दिसणार आहे. यावर नीरज खूपचं लाजराबूजरा झालेला पाहयला मिळतोय. नीरजे त्याचं पहिलं प्रेम भलाफेक असल्याचं म्हंणत जरा हटके अंदाजात शक्तीला प्रपोज करताना दिसणार आहे.

यादरम्यान नीरज डान्स प्लसच्या स्पर्धकांसह धमाकेदार डान्स करताना दिसणार आहे. यामुळे प्रेक्षकांना नीरजाचा धमाकेदार डान्सिंग अंदाज देखील पाहायला मिळणार आहे. नीरजने लग्नातील डान्स तसचं विविध समारंभामध्ये केल्या जाणाऱ्या डान्सची स्टाइन करुन दाखवली आहे. यानंतर त्याने शक्तीची प्रपोज करण्याची इच्छा पूर्ण केली. शक्तीची प्रपोज करण्याची इच्छा ऐकूण होस्ट राघव जुयाल अधिकच चिंतेत पडला. मात्र बाकी सर्व जोरजोरात हसू लागले.

तसंच या व्हिडीओत नीरज त्याला स्वयंपाक बनवता येत नसून तो तिला जास्त वेळ देऊ शकत नसल्याचं सांगत आहे. तर नीरजने शक्तीला प्रपोज केलेलं राघवला आवडलं नसल्याचं पाहायला मिळतंय. यावेळी राघव हसत हसत “भावा तू चुकिच्या ठिकाणी भाला फेकलास” असं नीरजला म्हणाला. आणि त्याने नीरजला कडकडून मिटी मारली.


 

First Published on: September 28, 2021 3:15 PM
Exit mobile version