गायिका नेहा कक्कर नैराश्यग्रस्त

गायिका नेहा कक्कर नैराश्यग्रस्त

बॉलीवूडची गायिका- नेहा कक्कर

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्करचं ब्रेक झाल्यानंतर नेहा आता नैराश्यग्रस्त झाली आहे. हिमांश कोहली सोबत नेहा रिलेशिनशिपमध्ये होती. पण, काहीच दिवसांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झाल्याचं समोर आलं. त्यानंतर दोघांनीही एकमेकांना सोशल मीडियावरून अनफॉलो केलं. शिवाय, एकत्र असलेले फोटो देखील डीलिट केले. दरम्यान, सध्या आपण नैराश्यातून जात असल्याचं नेहानं इन्टाग्रामवर म्हटलं आहे. आपल्या इन्टाग्राम पोस्टमध्ये नेहा म्हणते की, सध्या मी नैराश्यानं ग्रासली आहे. जगातील सर्व नकारात्मक लोकांना धन्यवाद. आयुष्यातील सर्वात वाईट दिवस देण्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात. त्याबद्दल तुम्हा सर्वाचे आभार. तुम्ही जिंकलात!! सध्या नेहा कक्कर अत्यंत कठिण अशा दिवसातून जात आहे. त्यानंतर तिनं याबाबतची एक पोस्ट इन्टाग्रामवर लिहिली आहे.

नेहा कक्करला आपल्या भावना ऑन स्क्रिन आवरणं देखील कठिण झाल्या. संगीत कार्यक्रमादरम्यान एका भावनिक गाण्यादरम्यान नेहाला आपले आश्रू आवरणं कठिण गेले. यावेळी तिला रडू कोसळले. दरम्यान, ही सारी बाब कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड देखील झाली आहे. त्यानंतर एक शॉट घेण्यासाठी टीमला मोठ्या प्रमाणावर रिटेक देखील घ्यावे लागले. या साऱ्या प्रकारनंतर नेहा कक्करला तिच्या ब्रेकअपचा मोठ्या प्रमाणावर धक्का बसल्याचं दिसून येत आहे.

First Published on: January 4, 2019 10:15 PM
Exit mobile version