‘बिग बॉसच्या हाऊसमध्ये नेपोटिझनला जागा नाही’

‘बिग बॉसच्या हाऊसमध्ये नेपोटिझनला जागा नाही’

‘बिग बॉस’च्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये स्पर्धक राहुल वैद्यने जान कुमार सानूला नेपोटिझमचे प्रॉड्क्ट असे नाव दिले. यानंतर त्याला सांगितले की, त्याचे वडील कुमार सानू यांच्यामुळेच तो शो मध्ये आहे. ही गोष्ट स्पर्धकांना अजिबात आवडली नाही. जानने स्पष्ट केले की, त्याचे आईवडील त्याच्या बालपणीच वेगळे झालेले आहेत. यानंतर त्याला त्याच्या आईने वाढवले आहे, त्यामुळे यात नेपोटिझमचा प्रश्नच येत नाही.

‘वीकेंड का वार’ या आगामी एपिसोडमध्ये सलमान खान या विषयावर चर्चा करताना दिसणार आहे. त्याने राहुल वैद्यला त्याच्या विधानांसाठी प्रश्न विचारला आणि स्पष्ट केले की तो चुकीचा आहे आणि त्याने हे शब्द वापरायला नको होते.तसेच सलमानने सांगितले की एखाद्या पालकांनी जर त्यांच्या मुलांसाठी काही केले असेल त्याला नेमोटिझमचे लेबल लावणे शक्य नाही.

त्याने पुढे असेही सांगितले की, जान नेपोटिझममुळे गायक बनला असेल तर मग तो राहुल पेक्षा जास्त यशस्वी असायला हवा होता. त्याने राहुलला प्रश्न विचारला की त्याच्या मुलांनी जर गायन हा व्यवसाय निवडला तर तो त्याला सुध्दा नेपोटिझम म्हणेल का?

सलमान राहुलवर खूप नाराज झाला आहे आणि त्याने नेपोटिझमला कडवा प्रतिकार केला आणि ते चुकीचे असल्याचे सांगितले. इंडस्ट्रीमधील कोणीही त्यांच्या मुलांवर कशाचीही सक्ती करू शकत नाही. राहुलला हे कळेल का आणि तो त्याची चूक मान्य करेल का?, असेही तो पुढे म्हणाला.


डिसेंबरमध्ये गायक आदित्य नारायण बोहल्यावर चढणार
First Published on: November 4, 2020 4:50 PM
Exit mobile version