‘लीला’ ट्रेलर आऊट; आपल्या अभिनयाने हुमा कुरेशीने केले प्रभावित

‘लीला’ ट्रेलर आऊट; आपल्या अभिनयाने हुमा कुरेशीने केले प्रभावित

अभिनेत्री हुमा कुरेशीची वेब सिरीज लीलाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. थ्रिलरने परिपुर्ण असणारी ही वेबसिरीज प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. या वेब सीरीजला ६ एपिसोडमध्ये स्ट्रीम केले जाणार आहे. लीलामध्ये हुमा कुरेशी धर्माविरोधात लढताना दिसत आहे. या वेब सिरीजचे कथानक प्रयाग अकबरच्य़ा पुस्तक ‘लीला’वर आधारलेले आहे. लीला या सिरिजमध्ये अशा एका शहराची कहानी आहे, ज्या ठिकाणी लोक धर्माच्या नावाखाली कोणालाही बळी चढवू शकतात.

या वेबसिरीजमध्ये हुमा कुरेशी शालिनी नावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे. हुमा या सिरिजमध्ये धर्माच्या विरूद्ध वागून एका मुस्लिम धर्मातील मुलाशी विवाह करते. फक्त २ मिनिटाच्या या ट्रेलरमध्ये सुरूवातीलाच हुमा आपल्या पती आणि मुलीसह आनंदी आयुष्य जगत आहे. याच आनंदाला कोणाची तरी नजर लागल्याचे दिसते. या ट्रेलरमध्ये हुमाला काही लोक किडनॅप करून तिच्या पतीला मारून टाकतात. त्यानंतर हुमाच्या आयुष्याला कलाटणी मिळते, असे दाखविण्यात आले आहे.

या ट्रेलरमध्ये अशा भयानक जगाची झलक बघायला मिळते, ज्यामध्ये हुमा कुरेशी आपल्या मुलीच्या शोधात आहे. या वेब सिरिजमध्ये हुमाने एक पॉवर फुल भूमिका साकारली आहे. या सिरीजला दीपा मेहता, शंकर रमन आणि पवन कुमार यांनी एकत्रित दिग्दर्शित केले आहे. वेब सिरीज लीलीच्या माध्यमातून हुमा कुरेशी डिजिटलमध्ये पहिल्यांदाच पदार्पण करत आहे. सोशल मीडियावर या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

First Published on: May 17, 2019 1:50 PM
Exit mobile version