रुबिनाचा सुजलेला चेहरा पाहून नेटकऱ्यांना आली राखी सावंतची आठवण

रुबिनाचा सुजलेला चेहरा पाहून नेटकऱ्यांना आली राखी सावंतची आठवण

हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 14’ची विजेती रुबिना दिलैक सतत तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. रुबिना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे नवनवीन फोटो देखील ती अनेकदा शेअर करत असते. अशातच, रुबिनाने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोत तिच्या चेहऱ्याची वाईट अवस्था पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.

रुबिना दिलैकने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा चेहरा आणि ओठ सुजलेला दिसत आहे. रुबिनाने फोटोसोबत खाली कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “ताप, घशाचं इन्फेक्शन झाल्याने माझे ओठ आणि चेहऱ्यावर सूज आली आहे. मी आता एका बदकासारखी दिसत आहे. मी यामुळे खूप त्रासले आहे. मला माझा चेहरा पाहूनच खूप हसायला येत आहे.”

रुबिनाने आत्तापर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले असून ‘बिग बॉस 14’ ची ती विजेती आहे. रुबिना ‘खतरो के खिलाडी’मध्ये देखील दिसली होती.

 


हेही वाचा :

‘कुडिए ने तेरी वाइब’ गाण्यात अक्षय कुमारसोबत दिसणार मृणाल ठाकूर

First Published on: February 11, 2023 3:40 PM
Exit mobile version