‘हिंदी झिंगाटवर जोक्स बुंगाट’, सोशल मीडियावर खिल्ली!

‘हिंदी झिंगाटवर जोक्स बुंगाट’, सोशल मीडियावर खिल्ली!

झिंगाट गाण्याचे पोस्टर

मराठी सैराटचा रिमेक असलेल्या धडक सिनेमाची सर्वांनाचा उत्सुकता लागलेली आहे. धडकच्या ट्रेलर आणि टायटल साँगने तर प्रेक्षकांना नाराज केले. त्यानंतर प्रेक्षकांना सैराटमधल्या झिंगाटच्या हिंदी व्हर्जनची प्रतीक्षा होती. अजय-अतुलच्या सैराटमधील झिंगाटने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरश: झिंगवलं होतं. या गाण्याची घोडदौड एवढ्यावरच न थांबता हे गाणं अमराठी प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरलं. महाराष्ट्राबाहेरही अनेक लग्नांमध्ये मराठी झिंगाटवर अमराठी लोक थिरकताना पहायला मिळाले. त्यामुळे मराठीसह अमराठी प्रेक्षकही झिंगाटच्या हिंदी व्हर्जनची वाट पाहत होते. परंतु झिंगाटच्या हिंदी व्हर्जनने प्रेक्षकांची निराशा केली आहे. या गाण्याचे कौतुक होण्याऐवजी सोशल मीडियावर या गाण्याला ट्रोल केले जात आहे. या गाण्याचे बोल लोकांना आवडले नाहीत. सैराट आणि धडक सिनेमांमध्ये तुलना केली जाणार, दोन्ही सिनेमांमधील गाणी, अभिनय आणि संगीताचीदेखील तुलना केली जाणार याची सर्वांना कल्पना होती. धडकमधील गाणी आणि ट्रेलर दोन्ही सैराटच्या तुलनेत फिके पडल्याच्या प्रतिक्रया सोशल मीडियावर उमटत आहेत.

अजय – अतुल रॉक्स अगेन

धडक सिनेमासाठी झिंगाट हे गाणं अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. गाण्याला संगीत अजय – अतुलचंच आहे. तसेच या दोन भावांनीच हे गाणं गायलं आहे. तसेच हिंदी गाण्यासाठी मूळ मराठी झिंगाटचीच चाल वापरण्यात आली आहे. त्यामुळे संगीताच्या बाबतीत गाणं मराठी सैराटइतकंच उजवं आहे. परंतु गाण्याचे बोल लोकांना आवडलेले नाहीत. सोशल मीडियावरील प्रतिक्रिया पाहता लोकांना जान्हवीचा अभिनयदेखील आवडलेला दिसत नाही. त्याउलट इशान खट्टरचे दोन मित्र (मराठीत सल्या आणि लंगड्या होते तसे) भाव खाऊन जातात. गाण्याच्या शेवटच्या मिनिटात इशान आणि जान्हवीची चांगली केमिस्ट्री पहायला मिळते. अजय अतुलच्या संगीताची जादू हिंदी व्हर्जनमध्येदेखील कायम राहिली आहे. गाणं ट्रोल जरी होत असलं तरी हिंदी झिंगाटदेखील हिट होणार असे वाटते. युट्यूबवर रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत गाणं तब्बल ५ लाख लोकांनी पाहिलं आहे.

हिंदी झिंगाट न आवडलेले लोक #zingaatRuined असा हॅशटॅग वापरुन ट्विटर आणि फेसबुकवर व्यक्त होत आहेत.

पाहुयात नेटीझन्सच्या काही प्रतिक्रिया

 

 

 

 

 

First Published on: June 27, 2018 4:04 PM
Exit mobile version