भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार ‘फत्तेशिकस्त’

भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार ‘फत्तेशिकस्त’

फत्तेशिकस्त

फर्जंद’ चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणाऱ्या भारतातील पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून आपल्यासमोर घेऊन येणार आहे.

मराठ्यांचे पराक्रमी पर्व शिवाजी महाराजांपासून सुरु होते. ‘रयतेचा राजा’ किंवा ‘जाणता राजा’ याबरोबरच महाराजांना ‘शस्त्रास्त्रशास्त्र’ पारंगत म्हटले जाते… त्यांच्या युद्धनीतीचे धडे जगभरात अनेक देशांच्या सैन्यदलांना दिले जातात… त्यांच्या कुशल युद्ध नेतृत्वाखाली मराठ्यांनी केलेल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकची कथा उलगडणाऱ्या “फत्तेशिकस्त” या ऐतिहासिक चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी धैर्याने, शौर्याने आणि तळपत्या तलवारीच्या जोरावर हिंदवी स्वराज्याचे तोरण उभारले. ‘आता थेट घुसायचं आणि गनिम तोडायचा…’ असं लिहिलेल्या या पोस्टरमध्ये शिवाजी महाराजांच्या तळपत्या तलवारीचा व त्यांच्या आत्मविश्वासाचा हाच दरारा पहायला मिळतो आहे. ‘गनिमी कावा’ चे तंत्र वापरत छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा फत्ते केल्या आहेत. ए.ए फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत ‘फत्तेशिकस्त’ हा चित्रपट शिवाजी महाराजांनी फत्ते केलेल्या अशाच एका थरारक गनिमी काव्यावर आधारित आहे. भारतातल्या पहिल्या सर्जिकल स्ट्राईकचा थरार ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.

छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, वि.स खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांची आहेत. वेशभूषा पौर्णिमा ओक यांची असून रंगभूषा सानिका गाडगीळ यांची आहे. ध्व्नीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. साहस दृश्ये बब्बू खन्ना तर नृत्यदिग्दर्शन सुभाष नकाशे यांचे आहे. व्ही. एफ.एक्स इल्युजन ईथिरीअल स्टुडियोज यांचे आहे. कार्यकारी निर्माता उत्कर्ष जाधव आहेत.

First Published on: August 29, 2019 3:28 PM
Exit mobile version