‘सिम्बा’ पाठोपाठ आता चर्चा आहे ती रणवीर सिंगच्या ‘गली बॉय’ या आगामी चित्रपटाची. रणवीरसोबतच आलिया भट्टचीही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. नुकतचं ‘गली बॉय’ चित्रपचटातील रणवीरचं एक रॅप साँग रिलीज झालं असून, त्यामध्ये आलियाच्या काहीशा वेगळ्या आणि दमदार भूमिकेची झलक पाहायला मिळते आहे. काही दिवसांपूर्वी ‘गली बॉय’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं होतं. त्यानंतर प्रेक्षकांची आणि रणवीर, आलियाच्या चाहत्यांची चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली होती. चित्रपटातील रणवीर-आलियाच्या जोडीची, त्यांच्या भूमिकेची सगळीकडे चर्चा होती. अशातच आता ‘गली बॉय’ चित्रपटाचं आणखी एक पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये आलिया आणि रणवीरचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळतो आहे. हे पोस्टर पाहिल्यांनतर ‘गली बॉय’मध्ये रणवीर आणि आलियाचं नेमकं काय नातं असणार, त्यांची केमिस्ट्री कशी असणार याचं लोकांच्या मनातील कुतूहल वाढलं असणार यात शंका नाही. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ‘गली बॉय’चं हे नवंकोरं पोस्टर त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरुन शेअर केलं आहे.
#GullyBoyTrailer out in 2 days… Stars Ranveer Singh and Alia Bhatt… Directed by Zoya Akhtar… #GullyBoy new poster: pic.twitter.com/fksQa4228V
— taran adarsh (@taran_adarsh) January 7, 2019
‘गली बॉय’ चित्रपट यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला अर्थात १२ फेब्रुवारी २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. झोया अख्तरने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, यानिमित्ताने आलिया आणि रणवीर प्रथमच सिल्व्हर स्क्रीन शेअर करणार आहेत. तर दुसरीकडे ‘दिल धडकने दो’ चित्रपटानंतर झोया अख्तर आणि रणवीर सिंग पुन्हा एकदा एकत्र काम करत आहेत. सूत्रांनुसार, ‘गली बॉय’ ही एका रस्त्यावर वाढलेल्या म्युझिक रॅपरची, त्याच्या प्रेयसीची, त्यांच्या प्रेमाची आणि दोघांच्या लढ्याची गोष्ट आहे. आता हा ‘गली बॉय’ मोठ्या पडद्यावर काय कमाल दाखवतो हे येणारी वेळच सांगेल.