सुबोध भावे – श्रुती मराठेच्या लग्नाची ‘पत्रिका’!

सुबोध भावे – श्रुती मराठेच्या लग्नाची ‘पत्रिका’!

श्रुती मराठे - सुबोध भावे (प्रातिनिधिक फोटो)

मराठी सिनेमांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत. गेल्या काही वर्षांत विवध विषयांवरील मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर सुबोध भावे आणि श्रुती मराठेचा ‘शुभ मंगल सावधान’ हा नवीन सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचं पहिलं वहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये ‘शुभ मंगल सावधान’ विषयीची उत्सुकता ताणली गेली आहे.  याच सिनेमाची चर्चा होत असताना सिनेमातील सुबोध आणि श्रुतीच्या लग्नाची पत्रिका आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. ‘शुभ मंगल सावधान’ची ही नवी-कोरी लग्न पत्रिका सध्या सगळीकडे व्हायरल होते आहे. तुम्हाला मिळाली का ही पत्रिका?

शुभमंगल सावधानची लग्नपत्रिका (सौजन्य- इन्स्टाग्राम)

सिनेमाविषयी थोडक्यात :

यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमाद्वारे अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे.  बंध नायलॉनचे या सिनेमानंतर हे दोघेही पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. समीर रमेश सुर्वे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. ‘शुभ लग्न सावधान’ हे सिनेमाचं शीर्षक लक्षात घेता, हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित असल्याचा अंदाज येतो. दुबईत चित्रीकरण करण्यात आलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध आणि श्रुती झळकत असून, या दोघांची सुंदर प्रेमकहाणी यात दाखवली जाणार असल्याची जाणीवदेखील होते. पल्लवी जोशी यांची निर्मिती असलेला हा कौटुंबिक सिनेमा येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होत आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर एकत्र येत असलेल्या सुबोध-श्रुतीच्या चाहत्यांसाठी ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा खूप खास ठरणार, हे निश्चित.

शुभ मंगल सावधान- पोस्टर (सौजन्य-इन्स्टाग्राम)
First Published on: July 12, 2018 2:38 PM
Exit mobile version