‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील फितूराला हत्तीच्या पायदळी

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील फितूराला हत्तीच्या पायदळी

डॉ. अमोल कोल्हे यांची निर्मिती असलेली झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतून संभाजी महाराजांचा इतिहास घराघरात पोहचला आहे. यामुळे अनेकांना इतिहासाची गोडी लागली आहे. या मालिकेतील ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. छत्रपती संभाजी महाराजांविरोधात कुटील कारस्थान रचणारे अनाजी पंत यांना हत्तीच्या पायी देण्याची शिक्षा फर्मावली आहे. अनाजी पंत यांच्या कारस्थानात सामील असणारे सहकाऱ्यांना देखील हत्तीच्या पायदळी लवकरच देण्यात येणार आहे.

फितुरीचा शाप इतिहासाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच फितुरीला चाप बसवण्यासाठी फितुरांना कठोर शिक्षा ठोठवल्या होत्या. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील एक प्रमुख असलेले अनाजी पंत हे शिवारायांच्या पुत्राविरोधात बंड करून उठले. शिवरायांप्रती निष्ठा बाळगणारे अनाजी पंत संभाजी महाराजांविरोधात फितुर झाले. कारण निष्ठेपेक्षा महत्त्वकांक्षा वरचढ ठरली म्हणून अनाजी पंत हे फितुर झाले.

शिवाजी महाराजांसारख्या सिंहाचा संभाजी महाराज छावा होते. तेवढचे प्रतापी…तेवढाच शूर…तेवढाच पराक्रमी त्यामुळे वडिलांनी आखून दिलेल्या महामार्गावर चालताना त्यांचे विचार आणि आचार संभाजी महाराजांनीही अमलात आणले. स्वराज्याचा तुकडा पाडू इच्छिणाऱ्या नराधमांना कठोर देहांताची शिक्षा फर्मावली.

पुन्हा एकदा हाच सगळा इतिहास स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत रोमहर्षक मांडणी इतिहासातल्या या प्रसंगाची मालिकेत करण्यात आली आहे.

First Published on: July 12, 2019 4:44 PM
Exit mobile version