लग्नानंतर फ्लाइटमध्ये गौहरची अचानक झाली EX बॉयफ्रेंडसोबत भेट आणि

लग्नानंतर फ्लाइटमध्ये गौहरची अचानक झाली EX बॉयफ्रेंडसोबत भेट आणि

लग्नानंतर फ्लाइटमध्ये गौहरची अचानक झाली EX बॉयफ्रेंडसोबत भेट आणि

अभिनेत्री गौहर खान नुकतीच जैद दरबारसोबत लग्नबंधनात अडकली. लग्नाच्या दोन दिवसांनंतर अभिनेत्री गौहर खान कामाला लागली आहे. गौहर रविवारी लखनऊला शूटिंगसाठी रवाना झाली आहे. पण यादरम्यान फ्लाइटमध्ये गौहरची अचानक EX बॉयफ्रेंड कुशाल टंडनसोबत भेट झाली. कुशाल टंडनने यादरम्यानचा व्हिडिओ इन्स्टाग्राम स्टोअरी शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये कुशाल आणि गौहर एकाच सीटवर बसलेले दिसत आहेत.

व्हिडिओ शेअर करत कुशाल टंडनने लिहिले आहे की, ‘एक सुंदर योगायोगा, गौहर खानला लग्नाच्या शुभेच्छा.’ तसेच व्हिडिओ कुशाल बोलला आहे की, ‘मी आपल्या गावी जात आहे आणि बघा मी कोणाला भेटलो, गोड मैत्रिण. आम्ही योगायोगाने भेटलो, मी तिला स्टॉक करत नव्हतो.’ हे ऐकू गौहर हसू लागते. पुढे कुशल म्हणतो की, ‘ती खूप सुंदर दिसत आहे. मी तुझ्यासाठी खूप खुश आहे. कदाचित मला तुला प्रत्यक्षात भेटून शुभेच्छा द्यायच्या होत्या. गौहर लग्नाच्या शुभेच्छा.’ व्हिडिओच्या शेवटी कुशाल म्हणतो की, ‘हाय किस्मत.’

गौहर खान आणि कुशाल टंडन बिग बॉस सीझन ७मध्ये एकत्र होते. गौहर या सीझनची विजेता झाली होती. बिग बॉसच्या घरात गौहर आणि कुशालचे प्रेमप्रकरण सुरू झाले. बिग बॉस घरातून बाहेर आल्यानंतर गौहर आणि कुशाल रिलेशनशिपमध्ये होते. पण अचानक दोघांनी आपापला रस्त्या वेगळा केला. गौहर आणि कुशालचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना चांगलेच उधाणं आले होते. आता गौहरने लग्न केले आहे. २५ डिसेंबरला जैद दरबारसोबत तिने नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.


हेही वाचा – सुपरस्टार रजनीकांत यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज


 

First Published on: December 28, 2020 11:27 AM
Exit mobile version