नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह कायदेशीररित्या वैध नाही, कोर्टाचा निकाल

नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह कायदेशीररित्या वैध नाही, कोर्टाचा निकाल

नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह कायदेशीररित्या वैध नाही, कोर्टाचा निकाल

अभिनेत्री नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांच्या विवाहाबाबत आज कोलकत्ता न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. नुसरत जहाँ आणि निखिल जैन यांचा विवाह कायदेशीररित्या वैध नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. स्पेशल मॅरेज अॅक्टचे पालन या विवाहात केले गेले नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. निखिल जैन यांनी त्यांचे लग्न वैध असल्याचा दावा केला होता तर नुसरत यांनी त्यांचे लग्न बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. हायकोर्टाने देखील नुसरत यांचे म्हणणे खरे ठरवत त्यांचे लग्न बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

नुसरत आणि निखिल यांनी आम्ही पती पत्नीप्रमाणे राहत असल्याचा दावा केला होता. २०१९मध्ये नुसरत जहाँने प्रसिद्ध उद्योगपती निखिल जैनसोबत तुर्कीस्तानात विवाह केला होता. सुरुवातीच्या काळात त्यांचे नाते ठिक ठाक सुरू होते. मात्र पुढे जाऊन त्यांनी एकमेकांवर गंभीर आरोप देखील केले होते. नुसरत जहाँ मुस्लिम तर निखिल जैन हा हिंदू असल्याने त्यांच्या विवाहवर मुस्लिम धर्मीयांनी कडाडून विरोध केला होता.

अभिनेत्री आणि टीएमसीच्या खासदार नुसरत जहाँ यांनी ३ महिन्यांपूर्वीच एका मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्मानंतर देखल नुसरत यांना अनेक प्रश्नांना समोरे जावे लागले. मुलाचे वडील कोण अशा असंख्य प्रश्नांची चर्चा झाली. ट्रोलिंगनंतर नुसरत जहाँच्या मुलाचे वडील यशदास गुप्ता असल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे नुसरत यांच्या मुलाच्या जन्मदाखल्यावरही यशदास गुप्ता यांचे नाव असल्याचे म्हटले जात आहे. नुसरत यांनी त्यांच्या मुलाचे नाव यिशान जे दासगुप्ता ठेवल्याची माहिती देखील समोर आली आहे. यशदास हा बंगाली अभिनेता असून नुसरत जहाँ त्याच्याशी डेट करत असल्याचा चर्चा आहेत. दोघांनी गपचूप लग्न केल्याचे देखील म्हटले गेले आहे.

नुसरत जहाँ सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुसतचे तिचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या पोस्टमुळे देखील त्या सतत चर्चेचा विषय असतात.


हेही वाचा – Jai Bhim सिनेमामुळे आलेल्या धमक्यानंतर अभिनेता सुर्या तेजच्या घराबाहेर पोलीस तैनात

First Published on: November 17, 2021 8:59 PM
Exit mobile version