international men’s day निमित्त मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

international men’s day निमित्त मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत

मानसी नाईक

आज १९ नोव्हेंबर रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन (international men’s day) साजरा केला जातो. याच दिनानिमित्त चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करताना दिसत आहेत. मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना मानसी नाईक हिने सुद्धा नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे मानसी नाईक (manasi naik) सध्या चर्चेत आली आहे.

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिने तिच्या अभिनयासोबतच नृत्याने सुद्धा प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा निर्माण केली आहे. नुकतीच मानसीने आंतररराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचे सुंदर फोटोसुद्धा शेअर केले आहेत. यासोबत तिने अप्रत्यक्षरित्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाच्या शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. पोस्ट शेअर करत मानसी नाईक म्हणाली, ‘मी एका अशा कुटुंबात वाढले आहे, जिथे महिलांनी पुरुषांसोबत मिळून किंवा पुरुषांशिवाय बऱ्याच गोष्टी करून दाखवल्या आहेत. त्यामुळे आता ती क्षमता गमावण्याची भिती नसेल’. अभिनेत्री मानसी नाईकांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


हे ही वाचा – आयुष्मानच्या ‘अ‍ॅन अ‍ॅक्शन हीरो’मध्ये अक्षय कुमार आणि मलायका अरोराची होणार एन्ट्री

First Published on: November 19, 2022 9:24 PM
Exit mobile version