अरे! हा तर दुसरा टायगर श्रॉफ

अरे! हा तर दुसरा टायगर श्रॉफ

डेव्हिड शाहरिया (सौजन्य - इन्स्टाग्राम)

नुकतंच नवं घर घेतलेला टायगर श्रॉफ आपल्या अभिनय आणि नृत्य या दोन्हीसाठी नेहमीच चर्चेत असतो. डान्स असो वा फिटनेस टायगरचे बरेच चाहते आहेत. इतकंच नाही तर टायगरचा फिटनेस बघून अनेक युवादेखील त्याच्यासारखी शरीरयष्टी बनवण्याची स्वप्नं बघतात. पण असाच जर दुसरा टायगर श्रॉफ आहे असं म्हटलं तर? गोंधळून गेलात ना? साहजिकच आहे. एका रात्रीत टायगर श्रॉफसारखा दिसणारा हा मुलगा प्रसिद्ध झाला आहे. याचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचा फोटो पहिल्यांदा पाहिल्यानंतर टायगर श्रॉफ असल्याचा भास होतो. मात्र हा टायगर नसून आसामी मॉडेल डेव्हिड शाहरिया आहे.

टायगरसारखा हुबेहूब डेव्हिड

टायगर आणि डेव्हिड दोघंही हुबेहूब दिसतात. डेव्हिड शाहरिया हा एक आसामी अभिनेता असून अगदी त्याची शरीरयष्टीदेखील टायगरसारखीच आहे. त्यामुळं पहिल्यांदा त्याला बघितल्यानंतर टायगरचा फोटो असल्याचा भास होतो. युजर्सही त्याचा फोटो पाहून फसत आहेत. हेच कमी काय तो पेशानंही अभिनेता आहे. मात्र एका रात्रीमध्ये त्याचे अनेक फोटो व्हायरल झाल्यामुळं तो इंटरनेट सेन्सेशन बनला आहे. बऱ्याचदा आपल्याला टायगर श्रॉफ समजण्यात येतं असं डेव्हिडनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. पण आपल्याला आपला रस्ता स्वतःला निवडायचा असल्याचंही त्यानं सांगितलं. सुरुवातीला मला खूप बरं वाटत होतं. कारण इतक्या मोठ्या स्टारसारखं आपण दिसत असल्याचं कोणाला आवडणार नाही? पण मला स्वतःची ओळख मिळवायची आहे, असंही त्यानं स्पष्ट केलं आहे. सध्या डेव्हिड आसामी भाषेतील चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. लवकरच डेव्हिडनं एखादा हिंदी चित्रपट स्वीकारल्यास, आश्चर्य वाटायला नको.

First Published on: July 26, 2018 5:11 PM
Exit mobile version