लेखकहो तुमच्यासाठी

लेखकहो तुमच्यासाठी

लेखकहो तुमच्यासाठी

  एकांकिका स्पर्धा, राज्य व तसेच कामगार नाट्यस्पर्धा या सर्व स्पर्धा लक्षात घेतल्या तर वर्षाला दोनशे ते तीनशे नव्या संहिता लिहिल्या जातात. कल्पना एक अविष्कार अनेक या स्पर्धेसाठी एकांकिका लिहिणारे जे लेखक होते, त्यांना पुस्तकरूपाने या संहिता मिळत होत्या. शासन दरबारी संहितांचा संग्रह आहे. शिवाय काही संस्थांनी निवडक एकांकिका संग्रही ठेवलेल्या आहेत. या प्रवासात आणखीन नव्या लेखकांची फळी निर्माण व्हावी यासाठी बीईंग असोसिएशनने संहिता मंचाची स्थापना केलेली आहे.

नव्या लेखकांनी लिहिलेली नाटके पुस्तकरूपाने प्रकाशित केली जातात, परंतु रोख रक्कम देऊनही लेखकाचा गौरव केला जातो. हिंदीबरोबर मराठी लेखकांनीही या मंचात सहभागी व्हावे, त्यांच्या संहितेची योग्य ती दखल घेतली जावी यासाठी ज्येष्ठ रंगकर्मींची परीक्षण कमिटी स्थापन केलेली आहे. मराठीसाठी सतीश आळेकर, जयंत पवार आणि इरावती कर्णिक हे काम पाहणार आहेत. हिंदीसाठी रत्ना पाठक-शहा, अतुल तिवारी, रंजीत कपूर यांचा समावेश आहे. 10 एप्रिलपर्यंत या संहिता मिळाव्यात अशी मंचाची अपेक्षा आहे. संपर्कासाठी-9372377093

First Published on: March 11, 2019 4:12 AM
Exit mobile version