Thackeray Movie : ‘ठाकरे’ शिवाय अन्य चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही

Thackeray Movie : ‘ठाकरे’ शिवाय अन्य चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही

मराठी चित्रपटसृष्टीपासून ते बॉलीवूडपर्यंत सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ‘ठाकरे’ या चित्रपटाची. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ चित्रपटाचा ट्रेलर काल (बुधवारी) लाँच करण्यात आला. आधीपासूनच काही ना काही कॉन्ट्रव्हर्सीजमध्ये अडकलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर आता पुन्हा एकदा त्याविषयी विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. चित्रपट नक्की कधी प्रदर्शित होणार? याविषयी अनेक चर्चा आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर येत्या २५ जानेवारीला ‘ठाकरे’ चित्रपटाशिवाय इतर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारा इशारा शिवसेना चित्रपट सेनेचे सरचिटणीस बाळा लोकरे यांनी दिला आहे. प्रदर्शनाच्या तारखेबाबत धमकी वजा इशारा देणारी एक पोस्ट बाळा लोकरे यांनी सोशल मीडियावरदेखील शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी येत्या २५ जानेवारीला ठाकरे चित्रपटाशिवाय इतर कोणताही चित्रपट आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही, असे स्पष्ट शब्दात लिहीले आहे.

 

बाळसाहेब ठाकरेंवर प्रेम करणारे तमाम लोक आणि शिवसैनिक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कालच रिलीज झालेल्या ‘ठाकरे’च्या ट्रेलरला सध्या सोशल मीडियावर तूफान पंसती मिळते आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने चित्रपटात बाळसाहेबांची मध्यवर्ती भूमिका साकाली आहे. ज्यावेळी ठाकरे चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाले होते त्यावेळी नवाजुद्दीन हुबेहुब बाळासाहेब ठाकरेसांरखा दिसत असल्याचं मत अनेकांनी नोंदवलं होतं.

तीन चित्रपटांची टक्कर…

२५ जानेवारी २०१९ रोजी ‘ठाकरे’ चित्रपटासोबतच अभिनेत्री कंगना रणौतचा ‘मणकर्णिका’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे. तर दुसरीकडे याच तारखेला इमरान हाश्मीची मुख्य भूमिका असलेला ‘चीट इंडिया’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. ‘ठाकरे’ हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे बाळा लोकरेंनी दिलेल्या या धमकी वजा इशाऱ्याचा परिणाम अन्य दोन चित्रपटांच्या प्रदर्शनावर होणार का? हे येणारी वेळच सांगेल.

First Published on: December 27, 2018 11:54 AM
Exit mobile version