ऑस्कर विजेती गायिका आणि अभिनेत्री इरेन काराचं निधन

ऑस्कर विजेती गायिका आणि अभिनेत्री इरेन काराचं निधन

ऑस्कर विजेती गायिका आणि अभिनेत्री इरेन काराचं शनिवारी निधन झालं. इरेन काराचं वय 63 होतं. इरेन काराच्या निधनावर तिच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 26 नोव्हेंबर रोजी तिने राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला मात्र, अद्याप तिच्या मृत्यूचे खरे कारण समोर आलेले नाही.

अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री इरेन कारा ही तिच्या “फ्लॅशडान्स… व्हाट अ फीलिंग” या गाण्यासाठी प्रसिद्ध आहे. या गाण्यासाठी तिला ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार देखील मिळाला होता. इरेन काराने ‘क्लिंट ईस्टवुड आणि टॅटम ओ’नील यांच्यासोबत चित्रपटांमध्ये काम केले होते. इरेनला ‘फेम’ आणि ‘फ्लॅशडान्स’ या गाण्यांमुळे प्रसिद्धी मिळाली होती.

इरेन काराचं खासगी आयुष्य
1959 मध्ये ब्रॉन्क्स, न्यूयॉर्क शहरात जन्मलेली, इरेन काराने स्पॅनिश भाषेतील टेलिव्हिजनमध्ये कारकिर्दीची सुरुवात केली. स्पॅनिश आणि इंग्रजी दोन्ही भाषेतील अनेक ब्रॉडवे संगीत नाटकं केली. 1980 मध्ये प्रसिद्ध झाल्यावर तिला कोको हर्नांडेझची भूमिका करण्याची संधी मिळाली.

 


हेही वाचा :

कलाकाराच्या मृत्युपूर्वीच प्रसारमाध्यमांचा ‘जीवघेणा’ आततायीपणा !

First Published on: November 27, 2022 10:57 AM
Exit mobile version