पानिपत चित्रपटातील ‘मन में शिवा’ गाण रिलीज

पानिपत चित्रपटातील ‘मन में शिवा’ गाण रिलीज

मन में शिवा गाण्याचं ट्रेलर लॉंच

पानिपत चित्रपटाचे ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले होते. प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर या चित्रपटातील ‘मर्द मराठा’ हे प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यालाही चाहत्यांचे पसंती दर्शवली. आता पानिपत चित्रपटातील दुसरे गाणे देखील रिलीज झाले आहे. दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट म्हणून पानिपतकडे पाहिले जाते. या चित्रपटातील दुसरे गाणे, ‘मन में शिवा’ हे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे गाणं तीन शिवा म्हणजे भगवान शिव, छत्रपती शिवाजी महाराज आणि सदाशिवराव भाऊ यांना मानवंदना देणारे आहे. या गाण्यामध्ये अभिनेता अर्जून कपूर, अभिनेत्री कृती सेनॉन आणि चित्रपटातील इतर कलाकार दिसत आहेत. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन संगीतकार जोडी अजय-अतूल यांनी केले असून हे गाणे जावेद अख्तर यांनी लिहिलेले आहे. तसेच कुणाल गांजावाला, दीपांशी नागर आणि पद्मनाथ गायकवाड यांनी आपल्या मधूर आवाजात हे गाणं गायलं आहे.

लाल किल्ल्यावर झालेला मराठ्यांचा विजय आणि सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा लाल किल्ल्यावर फडकावलेला मराठ्यांचा झंडा या घटनेवर आधारीत हे गाणं आहे. एकंदरीतच पानिपतमध्ये झालेल्या तिसऱ्या लढाईवर हा चित्रपट बेतला असून ‘मर्द मराठा’ या हाय एनर्जी गाण्यानंतर ‘मन में शिवा’ देखील एक पॉवर पॅक्ड गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. आशुतोष गोवारिकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं असून सुनीता गोवारिकर आणि रोहित शेलताकर यांची कंपनी विजन वर्ल्डन या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात संजय दत्त, अर्जून कपूर आणि कृती सेनॉन मुख्य भूमिकेत दिसत आहेत. हा चित्रपट ६ डिसंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

First Published on: November 24, 2019 3:07 PM
Exit mobile version