ऑस्कर पटकवणारा ‘पॅरासाईट’ हा पहिला आशियायी चित्रपट!

ऑस्कर पटकवणारा ‘पॅरासाईट’ हा पहिला आशियायी चित्रपट!

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ऑस्कर सोहळा अखेर पार पडला. यंदाच्या ऑस्करवर ‘पॅरासाइट’ या चित्रपटाने छाप पाडली. ऑस्करच्या अंतीम फेरीपर्यंत पोहोचणारा हा पहिलाच दक्षिण कोरियन चित्रपट आहे. याव्यतिरीक्त अभिनेता जोकिन फिनिक्सने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले.

सुरूवातीपासूनच पॅरासाईट सिनेमा चर्चेत होता. पॅरासाईटला कडवी स्पर्धा होती ती १९१७ या चित्रपटाशी. पॅरेसाईट सिनेमाने तब्बल ४ ऑस्करवर आपलं नाव कोरलं. ओरिजनल स्क्रिनप्ले, बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट इंटरनॅशनल फिचर कॅटगरीमध्ये परासाईटला ऑस्कर मिळाला. एकाच सिनेमाला बेस्ट इंटरनॅशनल फिल्म आणि इंटरनॅशनल फिचर कॅटगरी असे दोन्ही अॅवॉर्ड एकत्र मिळाले.

पॅरासाईट सिनेमात गरीबी आणि श्रीमंत यांच्यातली दरी अत्यंत सुंदरपणे रेखाटली आहे. सिनेमाची कथा हीच या चित्रपटाची यूएसपी आहे. पॅरासाईट हा पहिला आशियायी सिनेमा आहे ज्याला ऑस्कर मिळाला आहे.

यंदाच्या ऑस्करमध्ये सर्वात जास्त अपेक्षा जोकर या चित्रपटाकडून होत्या. कारण या चित्रपटाने सर्वाधिक ११ नामांकनं मिळवली होती. परंतु या चित्रपटाला केवळ दोन पुरस्कार पटकावता आले. त्या खालोखाल 1917 या चित्रपटाला १० नामांकने मिळाली होती. मात्र त्यांनाही केवळ दोनच पुरस्कारांवर समाधान मानावे लागले.

First Published on: February 10, 2020 12:01 PM
Exit mobile version