#CAAProtest: हिंदुस्तान आपके बाप का है… परेश रावल याचं प्रत्युत्तर

#CAAProtest: हिंदुस्तान आपके बाप का है… परेश रावल याचं प्रत्युत्तर

बॉलिवूडच्या अनेक कलाकरांनी सीएए आणि एनआरसीला समर्थन केलं आहे. या संदर्भात अभिनेते परेश रावल यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे परेश रावल सध्या चर्चेत आले असून त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यांनी ट्विट करताना असं लिहिलं आहे की, ‘मित्रांनो तुम्हाला सिद्ध हे करायचे आहे की तुमचे वडील भारताचे आहेत का?’ त्यांच्या या ट्विट वरून नेटकरी टीका करत आहे. याचं ट्विटवर प्रतिक्रिया देताना एका युझरने लिहिलं, ‘पहिला तुम्ही सिद्ध करता तुमचे वडील तुमचे खरे वडील आहेत का?’

परेश रावल यांनी सीएए आणि एनआरसी विरोध करणाऱ्या लोकांवर निशाणा साधला आहे. त्यांनी असं ट्विट केलं आहे की, ‘मित्रांनो तुम्हाला हे सिद्ध करायचं नाही आहे की भारत तुमच्या वडिलांचा आहे का? तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे की, तुमचे वडील भारताचे आहेत का? सीएए कायद्याविरोधातील आंदोलनात लोकांनी लोकप्रिय राहत इंदौरीची शायरी ‘सबका खून शामिल हैं इस मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है’ याचा वापर केला होता. यालाचं परेश रावल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी चित्रपटसृष्टीसोबत राजकारणात देखील आपली भूमिका उत्तमरित्या पार पाडलेली आहे. परेश रावल यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये खलनायक आणि विनोदी भूमिका साकारल्या आहेत. ‘ओएमजी’, ‘वेलकम’, ‘हेरा-फेरी’, ‘संजू’ या चित्रपटांमधील अभिनयाबाबत खूप कौतुक केलं आहे. लवकरच ‘हंगामा २’ या चित्रपटात ते पाहायला मिळणार आहेत. याशिवाय या चित्रपटात शिल्पा शेट्टी, मीजान जाफरी आणि प्रणिता सुभाष मुख्य भूमिकेत दिसणार आहे.


हेही वाचा – नेटिझन्सचा उतावळेपणा; जीवित सेझलला वाहिली श्रद्धाजंली


 

First Published on: January 27, 2020 3:27 PM
Exit mobile version