लोकांना एवढं दुःख झालंय… ‘बेशरम रंग’च्या वादावर ‘पठाण’च्या लेखकाने दिली प्रतिक्रिया

लोकांना एवढं दुःख झालंय… ‘बेशरम रंग’च्या वादावर ‘पठाण’च्या लेखकाने दिली प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा ‘पठाण’हा चित्रपट येत्या वर्षात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट महिन्याभरापासून चर्चेत आहेत. परंतु ‘पठाण’हा चित्रपट मागील काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’या गाण्याबद्दल काही लोक सतत विरोध करत आहेत. शिवाय या गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकनी घालून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात आला आहे. या चित्रपटामुळे सामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत अनेकजण आपली प्रतिक्रिया मांडू लागले आहेत. दरम्यान, अशातच आता या चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशिरने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

एका वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीत ‘पठाण’चित्रपटाचे लेखक मनोज मुंतशिर यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, “जर लोकांना एवढंच दुःख झालंय म्हणजे नक्कीच काहीतरी चुकीच झालं आहे.” पुढे सविस्तर बोलताना म्हणाला की, “जर त्यांनी शूटिंगदरम्यान चूक ओळखून सुधारली असती तर कलाकारांनी आणि क्रूने त्यावेळी ते नीट केलं असतं आणि यामुळे एवढा वाद देखील झाला नसता.”

25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार चित्रपट
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.


हेही वाचा :

‘झूमे जो पठाण’ मोडणार ‘बेशरम रंग’ गाण्याचा रेकॉर्ड; एका दिवसात 18 मिलियन व्ह्यूज

First Published on: December 23, 2022 12:26 PM
Exit mobile version