#BoycottChhpaak ते #ISupportDeepika ट्विटरवर का होतंय ट्रेंड?

#BoycottChhpaak ते #ISupportDeepika ट्विटरवर का होतंय ट्रेंड?

अभिनेत्री दीपिका पादुकोणने जेएनयूच्या आंदोलनात सहभाग घेतला यानंतर सोशलमिडीयावर मिश्र प्रतिक्रीया उमटल्या. सध्या ट्विटरवर दोन ट्रेण्ड जोरदार सुरू आहेत. #BoycottChhpaak आणि #ISupportDeepika या दोन ट्रेण्डमुळे ट्विटरव वॉर रंगलं आहे. ७ जानेवारीला दीपिका विद्यार्थी नेता कन्हैया कुमारसोबत जेएनयूत गेली. यावेळी तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वांना एकजुटीने राहण्याचं आवाहनही केलं. दीपिका जेएनयूत दहा मिनिटं होती. दीपिकाने जेएनयूच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्यामुळे भाजपाने आक्षेप घेतला आहे.

 

दीपिकाने जेएनयूच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट केल्यानंतर भाजपचे दिल्लीतील प्रवक्ते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी ट्विट करून ‘छपाक’वर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं आहे. ‘दीपिकाने तुकडे तुकडे गँग आणि अफझल गँगला पाठिंबा दिला आहे. तिच्या सिनेमावर बहिष्कार घाला,’ असं आवाहन बग्गा यांनी ट्विटरवरून केलं. त्यानंतर ट्विटरवर #BoycottChhpaak हा ट्रेंड सुरू झाला.

तर काही नेटकऱ्यांनी ‘छपाक’ला पर्याय म्हणून ‘तान्हाजी’ सिनेमा बघण्याचं आवाहन केलं आहे. दीपिकाने तिच्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी वापरलेला हा फंडा योग्य नाही. त्यामुळे आम्ही ‘तान्हाजी’ सिनेमा पाहणार आहोत, असं नेटकऱ्यांनी म्हटलं असून ‘तान्हाजी’चे पोस्टरही ट्वविटर मोठ्या संख्येने शेअर केले आहेत.

पण यावेळी काही नेटकऱ्यांनी मात्र दीपिकाला सपोर्ट केला आहे. काहींनी आपण दीपिकाचा छपाक बघणार असल्याच म्हटलं आहे. अनेकांनी दीपिकाचे आभार मानले आहेत. जेएनयूच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट केल्याबद्दल तीचे आभार मानले आहेत. #DeepikaPadukone #ISupportDeepika #IStandwithDeepika हे हॅश टॅग वापरून दीपिकाला सपोर्ट केला जात आहे.

सोमवारी रात्री मुंबईत कार्टर रोड येथे जेएनयू हल्लाविरोधात निषेध केला. दिग्दर्शक विशाल भारद्वाज, अनुराग कश्यप, जोया अख्यत, तापसी पन्नू आणि रिचा चड्ढा या बॉलिवूडच्या सेलिब्रिटी देखील या हल्ल्याविरोधात निषेध व्यक्त केला.सोमवारीपासून दीपिका पदुकोण ‘छपाक’ चित्रपटाच्या प्रमोशन करण्यासाठी दिल्लीत होती. रविवारी जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल बोलताना दीपिकाने यापूर्वी एनडीटीव्हीला सांगितलं होत की, ‘जेव्हा लोक कोणतीही भीती न बाळगता आवाज उठवतात तेव्हा हे पाहून खूप आनंद होतो.’असं म्हणाली.

First Published on: January 8, 2020 1:46 PM
Exit mobile version