‘पीएम मोदी’ चित्रपटामागचं शुक्लकाष्ठ संपेना

‘पीएम मोदी’ चित्रपटामागचं शुक्लकाष्ठ संपेना

पीएम नरेंद्र मोदी चित्रपटाचा मार्ग मोकळा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बायोपिक म्हणजेच पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या मागची साडेसाती संपतच नाहीये. पी एम मोदी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून अनेक वाद सध्या सुरू आहेत. हा चित्रपट १२ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. त्यानंतर त्या चित्रपटाच्या तारखेत बदल करण्यात आला. आता हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. ऐन निवडणूकीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध होत आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोध याचिका दाखल करण्यात आली आहे.

पीएम नरेंद्र मोदी या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सध्या सगळीकडेच निवडणूकीचे वारे वाहत आहेत. निवडूकीची तारीख जवळ येत आहे. ‘लोकसभा निवडणुक सुरू असल्याने या निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या सिनेमाच्या प्रदर्शनास तुर्तास स्थगिती देण्यात यावी, असं याचिकेत म्हटलं आहे. निवडणूकीच्या काळात मोदींची प्रतिमा लोकांमध्ये चांगली व्हावी यासाठी हा चित्रपट प्रदर्शित करत असल्याची टीका या आधी चित्रपटावर झाली आहे.

कोणी केली याचिका दाखल

आरपीआय गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी ही चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या स्थगितीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायामूर्ती नरेश पाटील आणि न्यायामूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोग, आणि चित्रपटाच्या निर्मात्याला उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

या सिनेमात विवेक ओबेरॉय मोदिंच्या भुमिकेत दिसणार आहे. त्याशिवाय या सिनेमात बरखा बिष्ट,मनोज जोशी,बोमन इराणी यांच्या मुख्य भुमिका आहेत. हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

First Published on: March 29, 2019 3:28 PM
Exit mobile version