‘झिरो’ चित्रपटाच्या याचिकेवर आता ३० तारखेला सुनावणी

‘झिरो’ चित्रपटाच्या याचिकेवर आता  ३० तारखेला सुनावणी

झिरो चित्रपट

बॉम्बे हायकोर्टाकडून शाहरुख खान आणि त्यांचा आगामी चित्रपट झिरोचे निर्माते यांच्या विरोधातील याचिकेवरील सुनावणी ३० नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. सिख समूहाने शाहरुख आणि चित्रपटाने निर्माते त्यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. झिरोच्या ट्रेलर्समध्ये सिख समूहाच्या भावना दुखावणारे दृश्य असल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले होते. त्यामुळे अमृत सिंग खालसा या वकिलाने महिन्याच्या सुरुवातीलाच यासंबंधीची याचिका दाखल केली होती. याचिकेमध्ये ते सीन हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

वाचा : दिल्लीच्या आमदाराकडून शाहरुख खानविरोधात फौजदारी खटला दाखल

काय आहे हे प्रकरण 

शाहरुख खानचा ‘झिरो’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये शाहरुखने कृपाण धारण केले आहे. शाहरुखच्या गळ्यात नोटांचा हार आणि कृपाण आहे. यावर शीख बांधवांनी आक्षेप घेतला आहे. शीख बांधवांना ज्या पाच वस्तू अनिवार्यपणे धारण करायचे असतात, त्यातील कृपान हे महत्वाचे आहे. शीख बांधव कृपानला वीरता आणि धाडसाचे प्रतिक मानतात. त्यामुळे ‘झिरो’ चित्रपटाच्या पोस्टरवर शाहरुखने धारण केलेल्या कृपाणवर शीख समुदायाने विरोध केला आहे.

वाचा : शाहरुखचं चाहत्यांना रिटर्न बर्थडे गिफ्ट; ‘झिरो’चा ट्रेलर लाँच!

शाहरुखच्या वाढदिवशी चित्रपटाचा ट्रेलर लॉंच

शाहरुख खानच्या वाढदिवशी म्हणजेच २ नोव्हेंबरला या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला. २१ डिसंबर २०१८ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान सोबत सलमान खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ, काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकाण आणि आलिया भट्ट दिसणार आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री श्रीदेवी देखील या चित्रपटातील एका गाण्यात दिसणार आहे.

First Published on: November 20, 2018 10:05 AM
Exit mobile version