‘पोरगं मजेतय’ लवकरच चित्रपटगृहात

‘पोरगं मजेतय’ लवकरच चित्रपटगृहात

‘पोरगं मजेतय’लवकरचं चित्रपटगृहात

मानवी भावभावना, नातेसंबंधांतील कुतूहलातून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या कंगोऱ्यांना अधोरेखित करणारे अनेक चित्रपट आजवर रुपेरी पडद्यावर आले. या चित्रपटांना आजवर प्रेक्षकांनीही पसंती दर्शवली. याच विषयावर भाष्य करणारा आगामी ‘पोरगं मजेतय’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ‘पोरगं मजेतय’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मकरंद माने यांनी केले आहे. या अगोदर त्यांनी ‘रिंगण’,‘कागर’ यांसारख्या चित्रपटांतून त्यांनी दिग्दर्शन केले. वडील आणि मुलगा यांच्यातील नात्याचा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर उलघडत जाणारा अर्थ, नव्याने सांधले जाणारे बंध, त्यापाठोपाठ येणाऱ्या जबाबदाऱ्या त्यातील संवाद-विसंवाद याचा सुरेख मेळ ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटातून साधला आहे. ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’ मधील मराठी चित्रपट विभागामध्ये या चित्रपटाची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

‘पोरगं मजेतय’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे. ध्वनी आरेखन पियुष शहा यांचे आहे. वेशभूषा अनुत्तमा नायकवडी तर कलादिग्दर्शन महेश कोरे यांचे आहे. रंगभूषा संतोष डोंगरे, नृत्यदिग्दर्शन मकरंद माने व विश्वास नाटेकर यांचे आहे. कास्टिंग योगेश निकम यांनी केले आहे. प्रोडक्शन हेड मंगेश जगताप आहेत. कार्यकारी निर्माते शंतनू गंगणे आहेत. नक्की या चित्रपटात काय असणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा – दुसऱ्या लग्नाच्या हट्टासाठी ६० वर्षांच्या आजोबांचे शोले स्टाईल आंदोलन

First Published on: March 10, 2021 6:36 PM
Exit mobile version